Tuesday, December 24, 2024
Homeब्रेकिंगपेट्रोल-डिझेल दरवाढीचे सत्र सुरुच, आज पेट्रोल आणि डिझेल 81 पैशांनी महागले!

पेट्रोल-डिझेल दरवाढीचे सत्र सुरुच, आज पेट्रोल आणि डिझेल 81 पैशांनी महागले!

पेट्रोल-डिझेल दरवाढीचे सत्र पुन्हा सुरु झाले आहे. आज पुन्हा पेट्रोल-डिझेलचे दर वाढले आहेत. मागच्या पाच दिवसातील ही चौथी दरवाढ आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी आज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवीन दर लागू केले आहेत. त्यानुसार पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये 80 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. सततच्या महागाईमुळे त्रस्त झालेल्या जनतेच्या खिशाला पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे आणखी फटका बसणार आहे.

नवीन दरवाढीनुसार, मुंबईमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 113.29 रुपये आणि एक लिटर डिझेलची किंमत 97.49 रुपये झाली आहे. तर दिल्लीत एक लिटर पेट्रोलचा दर 98.61 रुपये आणि डिझेलचा दर 89.87 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सलग अनेक दिवस वाढ होऊ शकते. जागतिक बाजारपेठांत कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतीमुळे भारतातील पेट्रोल-डिझेलची दरवाढ होत असल्याचं केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सांगितलं आहे. युक्रेन-रशिया युद्ध लांबण्याच्या संकेतामुळे कच्च्या तेलाचे दर वाढत असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, पेट्रोल-डिझेलचे दर गेल्या 137 दिवसांपासून स्थिर होते. पण 22 आणि 23 मार्चला पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये वाढ झाली. त्यानंतर 24 तारखेच्या विश्रांतनंतर 25 मार्चला पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये वाढ झाली आहे. 22 आणि 23 मार्चला पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये 80-80 पैशांनी वाढ करण्यात आली होती. 25 मार्चला पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 83 पैशांनी वाढ करण्यात आली होती. तर आज पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये अनुक्रमे 82-81 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. मागील पाच दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3.20 रुपयांची वाढ झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -