Sunday, July 27, 2025
Homeब्रेकिंगGold Rate today: आज सोने खात आहे भाव !

Gold Rate today: आज सोने खात आहे भाव !

सोने (Gold) पुन्हा एकदा भाव खात आहे. मध्यंतरी महागाई, युक्रेन रशिया युद्धाची पडसाद आणि रुपयाचे अवमुल्यन याचा सर्वच स्तरावर परिणाम दिसून आला होता. 1 फेब्रुवारी रोजी दहा ग्रॅम सोन्यासाठी 48,980 रुपये मोजावे लागत होते. तर 28 फेब्रुवारी रोजी हेच 10 ग्रॅम सोन्यासाठी 51,280 रुपये झाले. गुडरिर्टन संकेतस्थळानुसार गेल्या चार दिवसांपासून 52,590 रुपये प्रति 10 ग्रॅमवर स्थिर आहे. सोन्यात एका दिवशी 280 रुपयांची घसरण दिसत असली तरी सध्या फेब्रुवारी महिन्यापेक्षा मार्च महिन्यात सोन्याला झळाळी मिळाली आहे. दहा ग्रॅममागे जवळपास 3,610 रुपयांची दरवाढ (Rate Hike) दिसून येत आहे. असे असले तरी भारतीयांचे सोन्यावरील प्रेम अफाट आहे, त्यात तसू भर ही फरक पडत नाही. चला तर जाणून घेऊयात राज्यातील काही प्रमुख शहरातील सोन्याचे भाव आज काय आहे ते..

वर्षाला घरगुती वापरासाठी ३ गॅस सिलिंडर मोफत देणार, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबईत 22 कॅरेट सोन्यासाठी ग्राहकांना प्रति दहा ग्रॅम 47,950 रुपये तर 24 कॅरेटसाठी प्रति दहा ग्रॅम 52,310 रुपये मोजावे लागतील.

पुण्यात 22 कॅरेट सोन्यासाठी ग्राहकांना प्रति दहा ग्रॅम 48,050 रुपये तर 24 कॅरेटसाठी प्रति दहा ग्रॅम 52,400 रुपये आकार पडेल.

नागपूरमध्ये 22 कॅरेट सोन्यासाठी ग्राहकांना प्रति दहा ग्रॅम 47,980 रुपये तर 24 कॅरेटसाठी प्रति दहा ग्रॅम 52,340 रुपये मोजावे लागतील.

नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्यासाठी ग्राहकांना प्रति दहा ग्रॅम 48,050 रुपये तर 24 कॅरेटसाठी प्रति दहा ग्रॅम 52,400 रुपये द्यावे लागतील.

तर फ्रेशर्सलाईव्ह या संकेतस्थळानुसार, जळगावमध्ये 22 कॅरेट सोन्यासाठी ग्राहकांना प्रति दहा ग्रॅम 48,790 रुपये आणि 24 कॅरेटसाठी सोन्यासाठी प्रति दहा ग्रॅम 51,230 रुपये पडतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -