Tuesday, July 29, 2025
Homeब्रेकिंगसुकन्या समृद्धी योजना : दर महिन्याला 3000 रुपयांची गुंतवणूक, मिळणार १५ लाखांचा...

सुकन्या समृद्धी योजना : दर महिन्याला 3000 रुपयांची गुंतवणूक, मिळणार १५ लाखांचा परतावा!

ताजी बातमी ऑनलाईन टीम
सरकारने सुकन्या समृद्धी सारख्या योजनेद्वारे छोट्या बचतीवर व्याज दर पुन्हा एकदा स्थिर ठेवलेला पहायला मिळत आहे. सुकन्या समृद्धी योजनेवर 7.6 टक्के वार्षिक व्याज दर मिळतो. पुढील एप्रिल ते जून असे तीन महिने सरकारने पुन्हा एकदा हा व्याज दर पूर्वीप्रमाणेच स्थिर ठेवला आहे. म्हणजेच जर तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत आहात तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. पुढील तीन महिन्यांपर्यंत हा व्याजदर मिळत राहील. त्यामुळे या नव्या वित्तीय वर्षात सुकन्या समृद्धी योजनेद्वारे तुम्ही तुमच्या मुलीच्या नावावर रक्कम ठेवून गुंतवणुकीस सुरूवात करू शकता.



आकर्षक व्याजदर
सुकन्या समृद्धी योजनेद्वारे मुलींसाठी सुरू केलेली ही एक नवी छोटी बचत योजना आहे. सुकन्या समृद्धी योजना खाते या योजने अंतर्गत 10 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलींच्या आई-वडिल यांच्या द्वारा खाते उघडले जाऊ शकते. सरकार या योजनेद्वारे आकर्षक व्याज दर याव्यतिरिक्त टॅक्स फ्री बचत ही सुविधा देखील देते.

या योजने अंतर्गत तुम्ही कमीतकमी 250 रूपये आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रूपये ठेऊ शकता. हे खाते उघडून तुम्हाला तुमच्या मुलीच्या शिक्षण आणि इतर खर्च केला जाऊ शकतो. यामध्ये एका मुलीच्या नावावर एकच खाते उघडले जाऊ शकते. दोन मुली असतील तर तुम्हाला दोन वेगवेगळी खाती उघडावी लागतील.

कुठे उघडणार हे खाते?
सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत पोस्ट ऑफीस अथवा कमर्शिअल ब्रँचच्या अधिकृत शाखेमध्ये हे खाते उघडले जाऊ शकते. या योजने अंतर्गत मुलीच्या जन्मानंतर 10 वर्षांच्या आत कमीतकमी 250 रूपये ठेऊन खाते उघडू शकता.

कोणत्या कागदपत्रांची पुर्तता?
चालू वित्त वर्ष सुकन्या समृद्धी योजने अंतर्गत जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये ठेऊन गुंतवणूक करू शकता. खाते उघडण्याकरीता तुम्हाला फॅार्म सोबत पोस्ट ऑफिस अथवा बँकमध्ये मुलीचा जन्मदाखला द्यावा लागेल. याव्यतिरिक्त आई-वडिलांची ओळखीचा पुरावा जसे पॅन कार्ड, शिधापत्रक, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट द्यावे लागेल.

हे खाते मॅच्युर कधी होते ?
खाते उघडल्यापासून 21 वर्षानंतर अथवा मुलीचे 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिच्या लग्नाच्यावेळेस ( लग्नाची तारीख 1 महिना आधी किंवा तीन महिन्यांनंतर) सुकन्या समृद्धी खाते मॅच्युर होते. सुकन्या समृद्धी योजनेवर 7.6 टक्के व्याज मिळते.

15 लाख रुपयांची मिळणार परतफेड
जर तुम्ही या योजने मध्ये दर महिन्याला 3000 रुपयांची गुंतवणूक तुम्ही करत असाल तर 36000 रुपये वार्षिक रक्कम होते. १४ वर्षानंतर 7.6 टक्के वार्षिक कंपाउंडिंगच्या हिशेबाने तुम्हाला 9,11,574 रूपये परतावा मिळेल. 21 वर्षांनी किंवा मॅच्युरिटीनंतर जवळपास 15,22,221 रूपये इतका परतावा तुम्हाला मिळू शकतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -