Sunday, December 22, 2024
Homeतंत्रज्ञानआमंत्रणासाठी ‘ई-वेडिंग कार्डस्’ना पसंती

आमंत्रणासाठी ‘ई-वेडिंग कार्डस्’ना पसंती


सध्याच्या मोबाईल युगात व्हॉट्स अॅगप आणि फेसबुकचा वापर करताना दूरदेशी गेलेल्यांबरोबर संपर्क करणे अगदी सहज शक्य झाले. काळ बदलला तसे लग्नाचे आमंत्रण प्रत्यक्ष देण्याऐवजी सोशल मीडियाच्या माध्यमातून देणे सोयीस्कर पडत असून, आता ई-वेडिंग कार्डस्चा वापर करून आमंत्रण देण्यात येत आहेत.

लग्नसराईची सुरुवात झाली की पहिली गोष्ट केली जाते ती म्हणजे याद्या बनवणे. नातेवाईकांपासून आप्तेष्टांपर्यंत कोणाकोणाला आमंत्रण द्यायचे हे निश्चित केले जाते. सध्या छापील पत्रिकांपेक्षा ई-वेडिंग कार्ड, व्हिडिओज, जीआयएफ असे वेगवेगळ्या प्रकारे आमंत्रण दिले जाते. असे निमंत्रण पाठविण्याची दोन मुख्य कारणे असतात. एक म्हणजे जर बजेट कमी असणे आणि निमंत्रितांची यादी खूप मोठी असल्याने सर्वांना प्रत्यक्ष जाऊन निमंत्रण पत्रिका देणे शक्य नसते. यासाठी बरेच कुटुंबीय ई-वेडिंग कार्डसचा पर्याय निवडताना दिसतात.

ई-वेडिंग कार्डचे वैशिष्ट्य म्हणजे कमीत कमी वेळात जास्तीत मजकूर तो सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने, क्रिएटिव्हपणे आपल्या आप्तेष्टांपर्यंत पोहोचवता येतो. ई-वेडिंग कार्डस तुम्ही तुमच्या साईटवर, फेसबुक इव्हेंट, फेसबुक पेजवर, युट्युबवर अपलोड करू शकतो किंवा ई-मेलद्वारे पाठवू शकतो. ई-वेडिंग कार्डसचा दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे वधू-वर आणि कुटुंबीयांच्या छायाचित्रांसहित, व्हिडीओ यांच्या मदतीने ही निमंत्रण पत्रिका आणखी सुंदर डिझाईन करता येते.

ई-वेडिंग कार्डस जर डिझाईन्स करून घ्यायची असतील तर नामांकित दुकानांमध्ये तसेच काही संकेतस्थळांवरही डिझाईन करून घेता येतात. ई-वेडिंग ही सध्या जास्त
इफेक्टिव्ह पत्रिका आहे. यात तुम्हाला हवी तितकी व्हरायटी तुम्ही करू शकता. थीम वेडिंग असेल, डेस्टिनेशन वेडिंग असेल तर त्या स्थळाची थीम घेऊन किंवा वधू-वरांच्या प्रोफेशननुसार ई -कार्ड डिझाईन करता येते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -