Tuesday, July 29, 2025
Homeब्रेकिंगया शहरातील जलतरण तलाव आजपासून सुरू होणार

या शहरातील जलतरण तलाव आजपासून सुरू होणार

महापालिकेच्या क्रीडा विभागाने पिंपरी येथील वाघेरे जलतरण तलाव बुधवार (दि. 13) पुर्ण क्षमतेने नियोजित वेळेनुसार सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

काही दिवसांपूर्वीच निगडी-प्राधिकरण येथील जलतरण तलावही सुरू करण्यात आला आहे. ‘पोहणार्‍यांच्या हौसेवर पाणी’ अशा शिर्षकाची बातमी दैनिक पुढारीने (दि. 22) रोजी प्रसिद्ध केली. त्यानंतर पालिकेने जलतरण तलाव सुरू केली आहेत.

कोविडचा प्रादुर्भाव कमी झाल्याने महापालिकने पुर्ण क्षमतेने जलतरण तलाव सुरू करण्याचे आदेश क्रीडा विभागाला दिले होते. मात्र बंद असलेल्या जलतरण तलावांची अवस्था दयनिय झाली होती.

त्यामुळे सर्वच तलावांमध्ये स्टाईल, रंगरंगोटी, लाईटिंग, पाण्याच्या शुध्दतेची तपासणी, आसन व्यवस्था बसविण्याचे काम आदी कामे एकाच वेळी करण्यात आली.

क्रीडा विभागाच्या वतीने जलतरण तलाव सुरू करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. कासारवाडी, नेहरूनगर, संभाजीनगर, केशवनगर जलतरण तलाव सुरू होणार आहेत.

शहरातील सर्वच जलतरण तलाव सुरू करण्यात येणार आहेत. काही दिवसातच चार जलतरण तलाव खुले केले जाणार आहेत. यासाठी किमान 200 टँकर पाण्याची आवश्यकता भासणार आहे. पाण्याची सोय झाल्यानंतर तलाव सुरू केले जातील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -