ताजी बातमी ऑनलाइन टीम
मधेपुरा : मधेपुरा सदर उपविभागातील गमहरिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सदर पंचायत प्रभाग क्रमांक 1 मध्ये रविवारी सकाळी डबल मर्डर (Double Murder)ची घटना उघडकीस आली आहे. वेगवेगळ्या ठिकाणी पती-पत्नी (Husband Wife)चे मृतदेह आढळून आले. एकाच दिवसात दोन मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पत्नीचा मृतदेह घरात पलंगाखाली आढळून आला, तर घरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या प्रभाग क्रमांक 11 मध्ये पतीचा मृतदेह एका कालव्यात आढळून आला. मयत जोडप्याचे दीड वर्षापूर्वीच लग्न झाले असून महिला सात महिन्यांची गरोदर होती. दरम्यान, दोघांची हत्या का आणि कशी झाली ? याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही.
हत्येचे कारण अस्पष्ट
वंदना कुमारी असे मयत महिलेचे नाव असून विकास रॉय उर्फ बिक्कू असे तिच्या पतीचे नाव आहे. घटनेच्या वेळी पती-पत्नीशिवाय घरी कुणीही नव्हते, असे शेजाऱ्यांनी सांगितले. मयत महिलेची सासू तीन दिवसांपूर्वी माहेरी गेली होती, तर मोठा दीर नोकरीनिमित्त बाहेरगावी गेला असून त्याचे कुटुंबही गावात नव्हते. घटनेची माहिती मिळताच गमहरिया पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहेत. ज्या ठिकाणी पतीचा मृतदेह आढळून आला, त्या ठिकाणी गवत तुडवले गेले होते. त्यामुळे मृतदेह ओढून नेल्याचे दिसून येत आहे.