राज्यभरात चर्चा होणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथे होणाऱ्या जाहीर सभेला पोलिसांची परवानगी मिळावी यासाठी हालचाली सुरु झाल्या होत्या. परवानगी देण्याबाबत पोलिसांकडून आज सकाळपासून हालचाली सुरू झाल्या असून, आज (ता. 28) दुपारी बारा वाजेच्या जवळपास राज ठाकरे यांच्या सभेचे परवानगीपत्रक मिळण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे.
सभेला परवानगी देताना अटी आणि शर्थी?
राज ठाकरे यांच्या 1 मे रोजी होणाऱ्या औरंगाबादमधील सभेसाठी पोलीस प्रशासन अटी आणि शर्थीसह परवानगी देणार असल्याचं स्पष्ट झालं असलं तरी मनसे अध्यक्ष राज ठाकरे पोलिसांच्या अटी-शर्थी मान्य करून सभा घेणार का यावर प्रश्नचिन्ह आहे. राज ठाकरेंच्या औरंगाबादमध्ये 1 मे रोजी होणाऱ्या सभेला पोलिसांची परवानगी मिळण्याच्या दृष्टीने सध्या प्रयत्न चालू आहेत. या सभेला लाखोंचा समुदाय जमू शकतो, असं अंदाज वर्तवला जात आहे. औरंगाबादमध्ये राज ठाकरे 1 मे रोजी होणाऱ्या सभेमध्ये आपल्या कार्यकर्त्यांना काही आवाहन करतील का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांची (MNS Cheif Raj Thackeray) येत्या 1 मे रोजी औरंगाबाद येथे मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर जाहीर सभा होणार आहे. सभेच्या परवानगीसाठी आज दुपारी 12 वाजेपर्यंत परवानगीचं पत्रक जारी केलं जाऊ शकतं. पोलिसांनीही सभेसाठी बंदोबस्ताचा प्लॅन तयार केल्याचा समजतोय. राज ठाकरेंनी प्रक्षोभक भाषण करून नये, यासाठी पोलीस त्यांना नोटिसही बजावण्याची शक्यता आहे. पण नोटीस स्वीकारून राज ठाकरे अटी मान्य करतील का, हा महत्वाचा मुद्दा बनला आहे. दुसरीकडे मात्र मनसे कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी करत सभेची जोरदार तयारी सुरू केल्याचं दिसत आहे.
सभेसाठी पोलिसांकडून अटी-शर्थी..
1) सभेला येणार्या लोकांनी घोषणा देऊ नयेत, जेणेकरून सामाजिक वातावरण बिघडेल.
2) 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी धर्म, प्रांत, वंश ,जात यावरून वक्तव्य करू नये
3) सामाजिक सलोखा बिघडेल, असं कुठलंही वर्तन करण्यात येऊ नये.
4) लहान मुलं, महिला, वृद्ध यांची सुरक्षितता राहील याची दक्षता घ्यावी
5) सभेच्या ठिकाणी असभ्य वर्तन करू नये.
6) इतर धर्मियांच्या भावना दुखावणार नाहीत, याची काळजी घ्यावी.
7) सभेदरम्यान कुठल्याही प्राण्याचा वापर करता येणार नाही.
8) व्यक्ती किंवा समुदायाचा अपमान होणार नाही याची काळजी घ्यावी.
9) सभेपूर्वी आणि सभेनंतर वाहन रॅली किंवा मिरवणूक काढता येणार नाही.
10) वाहन पार्किंगचे नियम पाळावे.