Thursday, July 31, 2025
Homeमहाराष्ट्रपेट्रोल दरात घट नाही, लोडशेडिंग नाही, मास्क सक्तीही तूर्तास पुढे ढकलली; मंत्रिमंडळातील...

पेट्रोल दरात घट नाही, लोडशेडिंग नाही, मास्क सक्तीही तूर्तास पुढे ढकलली; मंत्रिमंडळातील महत्त्वाचे निर्णय काय?

ताजी बातमी ऑनलाईन टीम

राज्यात सध्या लोडशेडिंग करण्यात येणार नाही, तसेच मास्क सक्तीही तूर्तास पुढे ढकलली आहे. राज्याच्या मंत्रिमंडळाची(cabinet) आज बैठक पार पडली असून त्यामध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.



पेट्रोलच्या किमतीत घट नाही
राज्य सरकारकडून पेट्रोलवरचा व्हॅट कमी करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची चर्चा होती. पण आजच्या मंत्रिमंडळात(cabinet) यावर कोणतीच चर्चा झाली नसल्याचं राज्याचे मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं. त्यामुळे सध्यातरी सामान्यांना कोणताच दिलासा मिळाला नाही.



अतिरिक्त उस प्रश्नी अनुदान देणार
राज्यात अतिरीक्त उस निर्माण झाल्याने राज्य सरकार अनुदान देणार आहे. मराठवाड्यात अतिरिक्त उतापादन झाल्याने 25 लाख मेट्रीक टन उस पडून आहे. रिकव्हारी रेट 10 टक्क्यांच्या खाली असेल तर 200 रुपयांच अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर उस वाहतुक 50 किलोमिटरपेक्षा जास्त असल्यास प्रती किलोमिटर पाच रुपये अनुदान मिळणार आहेत.

राज्यात सध्या लोडशेडिंग नाही
राज्यातील लोडशेडिंगवर कोणतीही चर्चा करण्यात आली नसल्याची माहिती उर्जामंत्र्यांनी दिली आहे.

सामाजिक न्याय विभाग संलग्न महामंडळांबाबत निर्णय

महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ– 50 कोटींच्या
भागभांडवलावरुन 100 कोटींपर्यंत वाढ

अण्णाभाऊसाठे महामंडळ– 300 कोटींवरुन 1000 कोटींचे भागभांडवल

संत रोहीदास चर्मकार महामंडळ – 300 कोटी वरुन 1000 कोटी वाढ

दिव्यांग महामंडळ – 50 कोटी वरुन 500 कोटी भागभांडवल वाढ

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -