औंढा नागनाथ तालुक्यातील कंजारा येथे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्यानचार झाल्याकचा प्रकार उघडकीस आला आहे पीडितेच्या् तक्रारावरुन संशयित आराेपी पांडुरंग संभाजी कल्याणकर (वय २२ रा. कंजारा, ता. औंढा ) याच्यााविराेधात कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
कल्याणकर याचे एका अल्पवयीन मुलीसोबत ओळख झाली. लग्नाचे आमिष दाखवून त्यायने तिच्यावर अत्याचार केला. पीडित मुलीचे फोटो काढले. फाेटाे साेशल मीडियावर व्हाोयरल करण्या्ची धमकी देत मुलीवर अत्यााचार केले. पीडित मुलीने हा प्रकार तिच्या कुटुंबियांना सांगितला. तिच्याच कुटुंबीयांनी पांडुरंग कल्याणकरविरुद्ध तक्रार दाखल केली. सहायक पोलिस अधीक्षक यतिश देशमुख, कळमनुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील निकाळजे, उपनिरीक्षक के. पी. सोनुळे यांच्या पथकाने गावात भेट देऊन पाहणी केली. गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.