महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने (Maharashtra Education Board) राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांच्या हिता निर्णय घेतला आहे. तो म्हणजे राज्यातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कांत 15 टक्के सवलत (School fee Reduction) देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
राज्यात कोरोना काळात म्हणजेच वर्ष 2021 मध्ये शिक्षण विभागाने जाहीर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कात 15 टक्के सवलती देण्याचा निर्णय घेतला होता. आता त्या निर्णयाच्या अंमलबजावणीचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. शिक्षण विभागाने निर्णय दिल्यानंतर देखील राज्यातील अनेक शाळांना त्याची अंमलबजावणी केलेली नव्हती. त्यामुळे पालकांकडून संताप व्यक्त केला जात होता. त्यामुळे आता शिक्षण विभागाने पुन्हा परिपत्रक काढले आहे.
15 टक्के फी परत करा, नाही तर…
शिक्षण विभागाने आपल्या परिपत्रकात म्हटले आहे, की विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कात 15 टक्के कपात करण्यात आली होती. परंतु काही शाळांनी अद्याप निर्णयाची अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे पालकांकडून नाराजी व्यक्त केली जात होती. या संदर्भात बहुतांश पालकांच्या तक्रारी देखील प्राप्त झाल्या होत्या. विद्यार्थ्यांच्या पालकांकडून आकारण्यात आलेली 15 टक्के फी परत करा, नाही तर ती पुढील वर्षाच्या फीमध्ये समाविष्ट करा, असे आदेश राज्य शिक्षण विभागाने म्हटले आहे.
मुंबई शहर, नवी मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्हातील तसेच मुंबईच्या कार्यक्षेत्रातील सर्व शिक्षण अधिकाऱ्यांना हा शिक्षण विभागाकडून आदेश जारी करण्यात आले आहेत.
फी वाढीवरुन पुण्यात विद्यार्थी संघटना आक्रमक
दुसरीकडे, शिक्षणाचे माहेर घर असलेल्या पुण्यात फी वाढीवरून विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या आहेत. पुण्याती सावित्रीबाई फुले विद्यापीठाने तिप्पट फी वाढवल्यामुळे विद्यार्थी मोठ्या संख्येने आंदोलन केले आहे. ऑनलाईन परीक्षा, तिप्पट फी वाढीला विरोध असल्याचे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस संघटनेने म्हटले आहे.
फी वाढीवरून रणकंद पेटण्याची शक्यता…
ऑनलाईन परीक्षा आणि विद्यापीठातील तिप्पट फी वाढ, या विरोधात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या आहेत. त्यामुळे आता फी वाढीवरून पुण्यात रणकंद पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.