Tuesday, July 29, 2025
Homeब्रेकिंग‘त्या’ कारणामुळे सोने-चांदीच्या भावात आज झाले बदल

‘त्या’ कारणामुळे सोने-चांदीच्या भावात आज झाले बदल

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी रेपो दर आणि CRR मध्ये वाढ करण्याची घोषणा करून एकप्रकारे धक्का दिला आहे. आरबीआयने रेपो दर 40 बेसिस पॉइंट्सने वाढवून 4.40 टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे, तर सीआरआर 50 बेसिस पॉइंट्सने 4 टक्क्यांवरून 4.50 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. याचा मार्केटवर मोठा परिणाम झाला आहे. अशातच आता अमेरिकेची केंद्रीय बँक असलेल्या फेडरल रिझर्व्ह बँकेनं व्याजदरात अर्धा टक्क्याची वाढ केली. त्याचे पडसाद कमाॅडिटी बाजारावर उमटले.

आज गुरुवारी 5 मे 2022 रोजी मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव 47400 रुपये इतका वाढला. त्यात बुधवारच्या तुलनेत 400 रुपयांची वाढ झाली. आज मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा भाव 51700 रुपये वाढला. आज दिल्लीत सराफा बाजारात 22 कॅरेट सोन्याचा भाव 47400 रुपये इतका वाढला आहे. दिल्लीत 24 कॅरेटचा सोन्याचा भाव 51700 रुपये इतका झाला आहे.

तसेच एमसीएक्सवर आज गुरुवारी 5 मे 2022 रोजी सोने चांदीच्या किंमतीत मोठी वाढ झाली. सध्या एमसीएक्सवर 10 ग्रॅम सोन्याचा भाव 51,151 रुपये इतका वाढला आहे. त्यात 540 रुपयांची वाढ झाली. आज इंट्राडेमध्ये सोन्याचा भाव 51,320 रुपयांपर्यंत वाढला होता.

दरम्यान आता सोन्याचे भाव पुन्हा एकदा चढता आलेखाच्या दिशेने असतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. लग्नसराई आणि इतर सणांमुळे आता पुन्हा सोने खाली येईल, याची शक्यता कमी आहे. त्यातच महागाईच्या रोजच्या झटक्यामुळे आर्थिक अस्थिरता वाढत आहे. परिणामी गुंतवणूकदारही हवालदिल झालेले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -