Sunday, July 6, 2025
Homeब्रेकिंगमहत्वाची बातमी! नीट परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी 15 मेपर्यंत मुदतवाढ!

महत्वाची बातमी! नीट परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी 15 मेपर्यंत मुदतवाढ!

वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नॅशनल इलिजिब्लिटीकम एंट्रान्स टेस्ट म्हणजेच नीटची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. नीटच्या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज भरण्याची मुदत देखील संपत आली आहे. अशामध्ये नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत परीक्षेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना 15 मेपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

सीईटी सेलने प्रसिद्धिपत्रकाद्वारे अर्ज भरण्यास मुदतवाढ केल्याची माहिती दिली. एनटीएच्या वतीने मुदवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता विद्यार्थ्यांना 15 मेच्या रात्री 9 वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज (Apply online) भरता येणार आहे. तर त्याच दिवशी रात्री 11.50 वाजेपर्यंत परीक्षेचे निर्धारीत शुल्क देखील भरण्याची मुदत असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी लवकर अर्ज करावा.

व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा सीईटी सेलतर्फे घेतली जाते. एमबीबीएस (MBBS), बीडीएस (BDS) या अभ्यासक्रमांसोबत बीएएमएस (BAMS), बीयुएमएस (BUMS), बीएचएमएस (BHMS), फिजिओथेरेपी आणि अन्य शिक्षणक्रमांसह बीएस्सी नर्सिंग या शिक्षणाच्या प्रवेशासाठी नीट परीक्षा घेतली जाते. एमएचटी-सीईटी, एमबीए, एमसीए, पदव्युत्तर आर्किटेक्चर, पदव्युत्तर एमएचसीटी या परीक्षांसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेस मुदतवाढ मिळावी यासाठी विद्यार्थी आणि पालकांकडून मागणी होत होती. या मागणीची दखल घेत सीईटी सेलने अर्ज भरण्यास मुदतवाढ दिली.

तसंच, विलंब शुल्कासह विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार आहे. ही मुदतवाढ अंतिम असून, यापुढे मुदतवाढ देण्यात येणार नसल्याची विद्यार्थी आणि पालकांनी नोंद घ्यावी, असेही राज्य सीईटी सेलकडून सांगण्यात आले आहे. नीट परीक्षा येत्या 17 जुलै रोजी होणार आहे. ऑफलाईन पद्धतीने ही परीक्षा होणार असून तेरा भाषांमध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे. इंग्रजी, हिंदी आणि उर्दू या भाषांसह 13 भाषेचा यामध्ये समावेश आहे. त्यासोबतच आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मराठी, मल्याळम, ओडिसा, पंजाबी, तामिळ आणि तेलगु भाषेत देखील नीटची परीक्षा होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -