Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगमंदिरात झोपलेल्या पुजाऱ्याचा धारदार शस्त्राने वार करून खून

मंदिरात झोपलेल्या पुजाऱ्याचा धारदार शस्त्राने वार करून खून

धारदार शस्त्राने मानेवर वार करून पुजाऱ्याचा खून करण्यात आला. ही घटना आज (दि.७) सकाळी वाशिम तालुक्यातील केकतऊमरा शिवारात असलेल्या दुर्गा माता मंदिरात घडली. मारोती लक्ष्मण पुंड असे खून झालेल्या पुजाऱ्याचे नाव आहे. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, पुंड यांनी १२ वर्षांपूर्वी केकतऊमरा ते वाशिम रोड लगत असलेल्या स्वतःच्या शेतात दुर्गा माताचे मंदिर बांधले आहे. तिथे ते नियमित पूजाअर्चा करीत असतात. दरम्यान, पुजारी पुंड यांचा मुलगा गणेश पुंड हा आज सकाळी ५ च्या सुमारास त्यांना उठवण्यासाठी मंदिरात गेला. त्यावेळी वडिलांचा खून झाल्याचे त्याच्या निदर्शस आले.

दरम्यान, चोरीचा उद्देशाने मंदिरात पुजाऱ्याचा खून झाला असावा, असा पोलिसांचा अंदाज होता. मात्र, मंदिरातील इतर साहित्य शाबूत असल्याने संपत्ती किंवा इतर वैयक्तिक कारणातून खून झाल्याचा अंदाज पोलीस सूत्रांनी व्यक्त केला जात आहे. वाशिम पोलीस डॉग स्कॉड, फिंगर प्रिंट एक्सपर्ट यांच्या मदतीने मारेकऱ्यांचा शोध घेण्यात येत आहेत. पुढील तपास वाशिम ग्रामीण पोलीस करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -