Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रधक्कादायक! अवघ्या 4 महिन्यांच्या बाळाला रिक्षात ठेवून पालक गायब

धक्कादायक! अवघ्या 4 महिन्यांच्या बाळाला रिक्षात ठेवून पालक गायब

पुण्यातील खेड – शिवापूर येथे धक्कादायक घटना समोर आली आहे. एका चार महिन्याच्या बाळाला रिक्षात ठेवून पालक गायब झाले. त्यामुळे राजगड पोलिसांनी अज्ञात पालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या अर्भकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

पुण्यातील तोफीक शेख हे आपल्या सर्व कुटुंबासह शिवापूर येथील कमर अली दरवेश या प्रसिद्ध दर्गामध्ये (Dargah) आले होते. दर्गाजवळील वाहनतळावर त्यांनी आपली रिक्षा लावली आणि दर्गामध्ये गेले. सायंकाळच्या सुमारास ते दर्शनासाठी गेले होते त्यानंतर ते साडेनऊ वाजता परत आले. त्यावेळी त्यांना रिक्षामध्ये अर्भक आढळून आलं.

तोफीक यांनी आजूबाजूला विचारपूस केली मात्र त्यांना तिथे कोणीही बाळाची जबाबदारी घेणारं मिळालं नाही. अखेर त्यांनी राजगड पोलिसांशी संपर्क साधला, त्यानंतर पोलिसांनी आल्यावर अर्भकाला ताब्यात घेतलं आणि ‘सोफोश’ (SOFOSH) या संस्थेत त्याला दाखल केलं.

काय आहे सोफोश संस्था ?

कुमारी मातांना झालेल्या आणि सार्वजनिक ठिकाणी सापडलेल्या निराधार बालकांना सांभाळण्याचं काम सोफोश संस्था करते. ‘सोफोश’ ही एक शासनमान्य संस्था असून ससून रूग्णालयातील वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्या मंदाकिनी द्रविड आणि हर्शिला मनसुखाणी यांनी रूग्णांच्या मदतीसाठी
अधिष्ठाता डॉ. मेंडोसा यांच्या मार्गदर्शनाखाली 1964 मध्ये ‘सोफोश’ची स्थापना केली.
पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -