Monday, July 28, 2025
Homeमहाराष्ट्रवृद्धेचे दागिने सिटीलिंक बसमधील प्रवासात लंपास

वृद्धेचे दागिने सिटीलिंक बसमधील प्रवासात लंपास

नाशिक रोड ते पंचवटीदरम्यान सिटीलिंक बसमधून प्रवास करणार्याथ एका वृद्ध महिलेचे सुमारे 72 हजार रुपये किमतीचे दागिने लंपास झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हौसाबाई लहाने (रा. सोनगिरी, ता. सिन्नर) या पंचवटी येथे जाण्यासाठी नाशिकरोड येथून सिटीलिंक बसने प्रवास करीत असताना, त्यांची नजर चुकवून अज्ञाताने 60 हजार रुपये किमतीची तीन तोळे वजनाची सोन्याची पोत व 12 हजार रुपये किमतीची सोन्याची नथ असा ऐवज त्यांच्या पर्समधून लंपास केला. ही घटना लक्षात येताच, त्यांनी शोधाशोध केली; परंतु दागिने मिळाले नाही. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस अधिक तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -