ताजी बातमी ऑनलाईन टीम
मुज्जफरपूर – रस्त्यावर साचलेल्या पाण्यात, विजेच – खांबातून करंट (Current on road)उतरल्यामुळे, डोळ्यासमोर सख्ख्या मुलाचा मृत्यू (son death) पाहण्याची वेळ आई-बापांवर ओढवली. ही दुर्दैवी आणि धक्कादायक घटना मुज्जफरपूरमध्ये घडली आहे. या दुर्घटनेत आई वडिलांचा जीव सुदैवाने वाचला. हे कुटुंब दिल्लीवरुन मुज्जफरपूरला आले होते. त्यांना दरभंग्याला पुढे जायचे होते. मज्जफूपूरला(Muzzafarpur) ते जिथे उतरले तिथून पुढे ते बस स्टैंडकडे पायी निघाले होते. रस्त्यात पाणी साचले होते. तरुण मुलगा या पाण्यातून पुढे जात होता, तर आई वडील पाण्याच्या बाजूने जाण्याचा प्रयत्न करत होते. वीजेच्या खांबाजवळ आल्यानंतर पाण्यात या तरुणाला शॉक बसला.
आई वडिलांच्या डोळ्यासमोर तरण्या मुलाचा मृत्यू
मुलाला शॉक बसल्याचे दिसताच आई-वडिलांना काय कळावे हे कळेनासे झाले. वडिलांनी बाजूला पडलेल्या एका बांबूच्या काठीने मुलाला वाचवण्याचा प्रयत्न के आईने ओरडत त्याला ओढून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूत खेचण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. त्याला तिथून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, मात्र त्याचा मृत्यू झाला होता. पुढच्या महिन्यात या तरुणाचे लग्न होणार होते.
सरकारी ढिसाळपणाचा बळी
मुज्जफरपूरनगरमध्ये सरकारी कामाच्या ढिसाळपणामुळे या तरुणाचा मृत्यू झाला आहे. स्मार्ट सिटीच्या योजनेंतर्गत स्टेशन रोडसह इतर भागात विकास कामे सुरु करण्यात आली आहेत. रस्त्यावर जिथे पाणी साचले होते, तिथे रस्त्यावरील वीजेची तार तुटून पडली होती. त्यात करंट होता, याकडे दुर्लक्ष झाल्याने तरुणाचा बळी गेला.