भारतातील काही आघाडीवर असणाऱ्या टेलिकॉम कंपन्यांमध्ये काही टॉपच्या कंपन्या आहेत ज्या विविध रिचार्ज प्लॅन्स काही कालावधीने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी लाँच करत असतात.
देशात नावाजलेल्या या कंपन्यांमध्ये रिलायन्स जिओ, एअरटेल, व्होडाफोन-आयडिया सारख्या जागतिक मार्केटमध्ये महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या आणि ग्राहक वर्ग जास्त असणाऱ्या कंपन्या आहेत. या कंपन्यांची एकमेकांमध्ये चढाओढ नेहमीच सुरु असते. आता नुकताच व्होडाफोन-आयडिया कंपनीने एक स्वस्तातला रिचार्ज प्लॅन सादर केला आहे.
देशात टेलिकॉम कंपन्यांनी सध्या एकमेकांना टक्कर देण्यासाठी अनेक प्लॅन्स लाँच केले आहेत. सध्या व्होडाफोन-आयडिया (Vi) ने एक धमाकेदार प्लॅन लाँच केला आहे. ज्यामध्ये 28 दिवसांची SonyLIV Premium ची मोफत सदस्यता ग्राहकांना मिळणार आहे. कोणत्याही OTT प्लॅटफॉर्मच्या रिचार्जपेक्षा ही सर्वात कमी रक्कम आहे. कंपनीच्या या रिचार्ज प्लॅननुसार, कंपनीने अर्ध्या महिन्याच्या व्हॅलिडिटीसोबत आणलेल्या या खास प्लॅनचे वैशिष्ट्य म्हणजे फक्त 82 रुपयांमध्ये हा स्पेशल पॅक (Vi Recharge Plan) ग्राहकांना मिळणार आहे.
दिग्गज टेलिकॉम कंपनी Vi ने सोमवारी सोनी लिव सोबत आपल्या पार्टनरशीपची घोषणा केली आहे. SonyLIV द्वारे तुम्ही अनेक नवीन रिलीज झालेले सिनेमे व इतर अनेक जबरदस्त सिनेमे, सध्या क्रेझ असणाऱ्या अनेक वेब सीरीज आणि टीव्ही शोचा आनंद लुटू शकतात.
व्होडाफोन-आयडियाने सोनी लिव सोबत मिळून हा नवीन प्रीपेड पॅक लाँच केला आहे. जो सोनी लिव प्रीमियमची मेंबरशीप सोबत यूजर्संना एक्स्ट्रा डेटा सुद्धा ऑफर करतो.
ग्राहकांना अर्ध्या महिन्याच्या म्हणजेच 14 दिवसांच्या व्हॅलिडिटीनुसार हा एक Add On प्लॅन मिळणार आहे. याचा अर्थ तुम्ही तुमच्या सध्याच्या तुमच्या चालू रिचार्जसोबत हा प्लॅनदेखील घेऊ शकता आणि वापरू शकता. यावेळी ग्राहकांना 14 दिवसांच्या वैधतेदरम्यान 4 GB डेटाचा सुद्धा लाभ मिळणार आहे. याशिवाय या पॅकमध्ये Vi Movies & TV ची सुविधाही मिळू शकेल. यामुळे अतिशय कमी किंमतीत हा रिचर आणल्याने इतर कंपन्यांचे रिचार्ज प्लॅन्स काय असू शकतील आणि कोणते नवीन रिचार्ज प्लँन्स आणणार का आता याकडे लक्ष असणार आहे.