Monday, July 28, 2025
Homeमहाराष्ट्रतरुणाचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून

तरुणाचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून

लोणंद पोलीस स्टेशन हद्दीतील पाडेगाव (ता . फलटण) येथील शिवंचा मळा येथे घराबाहेर झोपलेल्या तरूणाचा अज्ञातांनी निर्घृण खून केल्याची घटना आज (मंगळवार) सकाळी उघडकीस आली. लोणंद पोलीस घटनास्थळी पोहचले असुन चौकशी सुरू केली आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, पाडेगाव (ता. फलटण) येथील पाडेगाव गावठाण पासून जवळपास दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या शिवंचामळा येथील राहुल नारायण मोहिते (वय 31) हा तरूण आपल्या घरासमोर झोपलेला होता. यावेळी अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने गळा कापून त्‍याचा निर्घृण खून केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. राहुल याच्या गळ्यावर धारदार शस्त्राने मोठा घाव घातल्याने जखम खोलवर गेल्याने मोठ्या प्रमाणावर रक्‍त स्त्राव होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.

याबाबतची माहिती मिळताच घटनास्थळी लोणंद पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल के. वायकर, पीएसआय गणेश माने, स्वाती पवार, स. फौ. महेश सपकाळ, पो.कॉ.संतोष नाळे, फैय्याज शेख, अविनाश शिंदे आदी तातडीने पोहचले. गळा चिरून खून केल्याने रक्‍ताच्या थारोळ्यात राहुल मोहिते याचा मृतदेह पडल्याचे दिसून आले.

पोलिसांनी पंचनामा सुरु केला असुन राहुल मोहिते हा तरूण ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करीत होता. त्याचे लग्न झाले नव्हते. त्याच्या कुंटुबात आई, वडील, भाऊ, भावजय असल्याचे सांगण्यात आले. राहुल याचा खून कोणत्या कारणासाठी केला असावा याचा तपास लोणंद पोलीस करत आहेत. घटनास्थळी पोलीस अधिक्षक तानाजी बरडे यांनीही भेट देऊन तपासासाठी सूचना केल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -