Tuesday, July 8, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर : सावकर मादनाईक यांचा राजीनामा

कोल्हापूर : सावकर मादनाईक यांचा राजीनामा

कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजकीय व्यवहार समितीचे अध्यक्ष सावकर मादनाईक यांची दि. १२ मे रोजी निवड झाली होती. शतकव्याचा विश्वासघात करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारकडून मला कोणतेही पद नको, असे सांगत बारा तासाच्या आत सहाय्यक जिल्हा नियोजन समिती अधिकारी गजानन पाटील यांच्याकडे सदस्यत्वाचा राजीनामा मादनाईक यांनी सादर केला.

याबाबत बोलताना सावकार मादनाईक म्हणाले की, कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यत्वाचा शासन निर्णय मला गुरुवारी वाचनात आला. सहा महिन्यापूर्वी सदर पदासाठी माझ्या नावाची शिफारस करण्यात आली होती. शेतकरी, पूरग्रस्त, कामगार, शेतमजूर या सर्वांना न्याय देण्यास महाविकास आघाडी सरकार पूर्णतः अपयशी ठरले आहे.

एफआरपीची मोडतोड करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अन्नात माती कालवण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने केले आहे. दि. ५ एप्रिल २०२२ रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडली असल्याची घोषणा केली आहे. तत्पूर्वी जिल्हा नियोजन समितीचे सदस्यपद मला नको आहे, असे कळवले होते. असे असताना देखील दि. १२ मे २०२२ रोजी झालेल्या शासन निर्णयामध्ये माझी जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदाच्या यादीत माझे नाव आले आहे.

शेतकऱ्यांचा विश्वासघात करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारकडून कोणतेही पद मला नको आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदाचा राजीनामा(Resignation ) दिलेला आहे. यावेळी स्वाभिमानी पक्षाचे शिरोळ तालुकाध्यक्ष शैलेश आडके, प्रकाश बंडगर आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -