Sunday, July 6, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर : दोन गव्यांच्या झुंजीत एकाचा मृत्यू

कोल्हापूर : दोन गव्यांच्या झुंजीत एकाचा मृत्यू

बाजारभोगाव व पोहाळे तर्फ बोरगाव (ता. पन्हाळा) या गावांच्या हद्दीवर दोन गव्यांच्या झालेल्या झुंजीत एक गवा मृत्युमुखी पडला. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. तानाजी पाटील (रा. पोहाळे) यांच्या ‘शिव’ नावाच्या शेतात हा गवा मृतावस्थेत आढळला. शिंग लागल्याने त्याला जखमा झाल्या होत्या. झुंजीमुळे पाच गुंठ्यांतील ऊस भुईसपाट झाला.

उसाच्या पिकात शुक्रवारी पहाटे गव्यांची झुंज सुरू झाली. या दोन गव्यांच्या झुंजीत एक गवा मृत्युमुखी पडला. वनपाल नाथा पाटील, वनरक्षक कुंडलिक कांबळे व संबंधित घटनास्थळी दाखल झाले. मृत्युमुखी पडलेला गवा सुमारे आठ ते नऊ वर्षांचा पूर्ण वाढ झालेला होता. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रोहित रानभरे यांनी गव्याचे विच्छेदन केल्यानंतर मृतदेह पुरण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -