Sunday, July 6, 2025
Homeराजकीय घडामोडीनवनीत राणांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा चँलेज, म्हणाल्या 'इतकी ताकद आहे तर…'

नवनीत राणांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा चँलेज, म्हणाल्या ‘इतकी ताकद आहे तर…’

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर एकच गोंधळ उडत राणा दाम्पत्यांना अटक झाली होती. तुरुंगातून सुटका झाल्यानंतर सुद्धा राणा दाम्पत्य अजूनही मुख्यमंत्र्यांवर टीका करत त्यांना आव्हान करत आहे. आज त्यांनी पुन्हा मुख्यमंत्र्यांना आव्हान केले आहे.

खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पुन्हा आव्हान केले आहे. दिल्लीतील कनॉट प्लेस येथील हनुमान मंदिरात हनुमान चालिसा पठण करण्यापूर्वी माध्यमांशी संवाद साधताना नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांना चँलेज केले. त्यांनी असे म्हटले आहे की, ‘आजच्या शिवसेनेच्या सभेचा टिझर पाहिला. त्यात उद्धव ठाकरे म्हणतात तुम्ही मला वज्रमूठ द्या, दात पाडण्याचं काम मी करतो. जर इतकी ताकद आहे तर औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहणाऱ्यांचे दात आधी तोडून दाखवा तर तुम्हाला मानेल.’

नवनीत राणा पुढे असे सुद्धा म्हणाल्या की, ‘उद्धव ठाकरेंच्या माध्यमातून महाराष्ट्रावर संकट आलेले आहे. हे संकट दूर करण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी मी प्रयत्न करत राहणार आहे.’ तसंच, ‘ज्या-ज्या ठिकाणी हनुमान चालिसा मला बोलता येईल त्या ठिकाणी मी बोलणार. मला बंद करण्यासाठी त्यांना 14 दिवस कमी पडतील. दिल्लीतील हे एक प्राचीन मंदिर आहे आणि त्यामुळे आम्ही येथे महाआरती करत आहोत.’, असे नवनीत राणा यांनी सांगितले.

दरम्यान, खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्याची घोषणा केली होती. त्यांच्या या घोषणेनंतर मोठा वाद निर्माण झाला होता. या गोंधळानंतर राणा दाम्पत्यांनी पत्रकार परिषद घेत आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली. पण यावेळी त्यांनी सामाजिक तेढ निर्माण करणारे विधान केल्यामुळे नवनीत कौर राणा आणि रवी राणा यांना खार पोलिसांनी अटक केली होती. नवनीत राणा भायखळा तुरुंगात तर रवी राणा हे तळोजा तुरुंगात होते. 12 दिवसांनंतर दोघांची सुटका झाली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -