12 वीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतिक्षा संपली आहे. आज, दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मार्च-एप्रिल महिन्यात परीक्षा घेण्यात आली होती. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना मोबाईलवर देखील SMS च्या माध्यमातून निकाल पाहता येणार आहे.
पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांचे निकाल आजच जाहीर करण्यात येणार आहेत. निकाल जाहीर करण्यापूर्वी सकाळी 11 वाजता राज्य शिक्षण मंडळाकडून पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. या पत्रकार परिषदेत राज्याचा निकाल किती टक्के लागला, विभागनिहाय निकाला संदर्भात सविस्तर माहिती देण्यात येईल.
दुपारी 1 वाजेपासून पाहू शकतात निकाल, निकालाबाबतच updates
विद्यार्थी आणि पालकांना maharesult.nic.in किंवा hscresult.mkcl.org
किंवा msbshse.co.in
या संकेतस्थळांद्वारे निकाल पाहता येईल.
विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम शिक्षण मंडळाशी संलग्न अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in आणि msbshse.co.in वर जावे.
होमपेजवर निकाल पेजवर क्लिक करा.
एका नवीन पेजवर पुनर्निर्देशित केले जाईल.
लॉगिन पेजवर, तुमचा रोल नंबर आणि इतर माहिती भरा
सबमिट करा.
तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
निकालाची प्रिंट तुम्ही काढू शकतात किंवा डाउनलोड करू शकतात.
पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांचे निकाल आजच जाहीर करण्यात येणार आहेत.
येथे पाहाता येईल निकाल…
http://www.maharesult.nic.in
http://www.maharesult.nic.in
msbshse.co.in
hscresult.11thadmission.org.in
hscresult.mkcl.org
mahresult.nic.in