सध्या आपण फेसबुक, WhatsApp, इंस्टाग्राम सारख्या प्लॅटफॉर्म्सचा चांगलाच वापर करत आहोत. कित्येकजण दिवसभरातील 3 ते 4 तास वेळ या प्लॅटफॉर्म्सवर काही ना काही बघण्यात घालत असतात. आता आपल्याला आवडणारं WhatsApp हे काहीसं बदलणार आहे. म्हणजेच WhatsApp मध्ये नवीन आकर्षक फीचर्स कंपनीकडून टाकण्यात येणार आहेत. सध्या WhatsApp तीन नवीन फीचर्सवर काम करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार आता WhatsApp हे Undo बटण, एडिट टेक्स्ट मेसेज पर्याय आणि डबल व्हेरिफिकेशन या तीन नवीन फीचर्सवर जोरदार काम करत आहे.
लवकरच आता WhatsApp आपल्या वापरकर्त्यांना(युजर्सना) मेसेज पाठवल्यानंतर त्यामध्ये एडिट करता येईल असं फीचर्स देणार आहे. सध्या WhatsApp वरून एखाद्याला आपण मेसेज केल्यास तो काही मिनिटांमध्ये डिलीट करू शकतो असं फीचर आहे. सदरील फीचर हे WhatsApp ने पाच वर्षांपूर्वी वापरकर्त्यांसाठी सुरु केले होते. या फीचरचा वापर करत असताना कधी काही आपण चुकून delete for me असं ऑप्शन निवडतो आणि नाईलाजास्तव तो मेसेज तसाच समोरच्याला सेंड होतो. असं होऊ नये म्हणून WhatsApp लवकरच undo बटण आणणार आहे.
यासोबतच WhatsApp आपल्या यूजर्सची सुरक्षा वाढवण्यासाठी double verification फीचर देखील आणणार आहे. काही दिवसांमध्ये येणाऱ्या WhatsAppच्या नवीन अपडेटमध्ये या फीचर्सचा समावेश असेल असं देखील बोललं जातं आहे. जेव्हा वापरकर्ता त्याचे स्वतःचे WhatsApp अकाउंट दुसऱ्या फोनमध्ये लॉग इन करतो तेव्हा त्याला double verificationला सामोरे जावे लागेल. सुरक्षेच्या दृष्टीने हे अत्यंत महत्वाचे फीचर असल्याचे बोलले जात आहे. एकंदरीत WhatsApp आगामी काळात आपल्या वापरकर्त्यांना सुखद धक्के देणार आहे हे मात्र नक्की.