मुंबईतील जुहू चौपाटीवर धक्कादायक घटना समोर आली आहे. जुहू चौपाटीवर फिरण्यासाठी आलेलेल्या 3 मुलांचा बुडून मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. यामध्ये दोन सख्खे भाऊ आहे.
यामध्ये दोन सख्खे भाऊ आहे. तर एका जणाला वाचवण्यात आले असून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुमुद्रात वाहून गेलेल्या मुलांचा शोध सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुहू चौपाटीवर आज संध्याकाळी ही घटना घडली. चेंबूर येथील राहणारे चार मुलं जुहू चौपाटीवर फिरण्यासाठी आली होती. चौपाटीवर समुद्रात खेळत असताना अचानक चौघे जण पाण्यात बुडले. पाण्यात बुडालेल्या मुलांचं वय हे 16 ते 21 वर्ष दरम्यान असल्याचे सांगितलं जात आहे.
यामध्ये 2 भावांचा समावेश आहे. तर इतर दोन जण हे त्यांचे मित्र असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेतून एका तरुणाला वाचवण्यात यश आले आहे. त्याला तातडीने सांताक्रुझ पोलीस स्टेशनला घेऊन गेले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. एका मुलाचा वाचवण्यात आले आहे. तर इतर तीन जणांचा शोध घेतला जात आहे. हेलिकॉप्टरच्या मदतीने या बेपत्ता मुलांचा समुद्रात शोध घेतला जात आहे.