Friday, October 31, 2025
Homeब्रेकिंगBreaking : गगनबावड्यातून शाळकरी मुलीचे अपहरण, पोलिसांत तक्रार दाखल

Breaking : गगनबावड्यातून शाळकरी मुलीचे अपहरण, पोलिसांत तक्रार दाखल

धामणी खोऱ्यातील धुंदवडे (ता.गगनबावडा) येथील दहावी इयत्तेत शिकणाऱ्या पंधरा वर्षिय विद्यार्थिनीचे शाळा सुटल्यानंतर अज्ञातांनी अपहरण केल्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी गगनबावडा पोलिसात केली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, धुंदवडे येथील पंधरा वर्षीय विद्यार्थिनी शेळोशी (ता.गगनबावडा) येथील माध्यमिक विद्यालयात दहावीच्या वर्गात शिक्षण घेत असून, सदर मुलगी शनिवारी आपल्या गावातील विद्यार्थिनी बरोबर शाळेला गेली होती. शनिवार सकाळच्या सत्रात शाळा असल्यामुळे सुमारे अकराच्या सुमारास शाळा सुटली. तेव्हा पर्यंत ती वर्गात होती.शाळा सुटल्यानंतर बराच वेळ ती घरी न परतल्याने घरच्या लोकांनी तिची शोधाशोध सुरू केली असता आढळून आली नाही.

त्यामुळे संबंधित मुलीच्या वडिलांनी तात्काळ पोलीसात धाव घेत आपल्या मुलीचे शाळेतून रस्त्याने येताना अज्ञात लोकांनी अपहरण केले असल्याची फिर्याद दिली आहे.अधिक तपास गगनबावडा पोलिस करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -