Sunday, December 22, 2024
Homeकोल्हापूरवारणा नदीपात्रात सापडला मृतदेह

वारणा नदीपात्रात सापडला मृतदेह

वारणा नदीत सातवे गावच्या हद्दीतील पवारांची मळी या ठिकाणी नदीपात्रात संभाजी रघुनाथ जाधव (वय ६० रा. जांभळेवाडी) यांचा शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास मृतदेह सापडला. या घटनेची नोंद कोडोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याबाबतची फिर्याद भाऊ सुनील जाधव यांनी पोलिसांत दिली आहे. अधिक माहिती अशी की, दि. १५ जून रोजी रात्री आठच्या सुमारास सावर्डे मांगले धरणावर एक अज्ञात व्यक्ती संशयितरीत्या सायकल लावून उभा होता, अशी माहिती सावर्डेचे पोलीस पाटील सागर यादव यांना समजली होती.

पोलीस पाटील यांनी धरणावर येऊन शोध घेण्याचा प्रयत्न केला; परंतु व्यक्ती आढळून आली नाही. पोलीस पाटील व मृताचे नातेवाईक यांनी शनिवारी सकाळी आठपासून नदीपात्रात शोधाशोध करत असताना सातवे गावच्या हद्दीतील पवारांची मळी या ठिकाणी नदीपात्रात जाधव यांचा मृतदेह सापडला. कोडोली उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -