राज्यात मुसळधार पाऊस (Heavy rains in the state) सुरू असल्याने अनेक गावांमध्ये पुराचं पाणी शिरल्याचं चित्र आहे. यामुळे रस्तेही पाण्याखाली गेले आहे. अशात आता विसरवाडी गावाजवळील पुल पाण्याखाली गेल्याने नागपूर-सुरत राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प (Nagpur Surat Highway Transport) झाल्याची माहिती समोर येत आहे.
नवापूर तालुक्यात (Navapur taluka) दोन दिवसांपासून मुसळधार पावसाची (Heavy rains) संततधार असल्याने (Nandurbar Rain Update) नदी-नाल्यांना पूर आला आहे. सरपणी नदीसह नागन व नेसू नद्यांना मोठा पूर आल्याने पूलावरुन पाणी वाहू लागले आहे. यामुळे नागपूर-सुरत राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुक पूर्णत बंद झाल्याने दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. तसेच पिंपळनेर ते चरणमाळमार्गे जाणारा रस्ता देखील बंद झाला असून साक्री ते पिंपळनेर मार्गावरील कान नदीला पूर आल्याने पूलावरील वाहतुक बंद झाली आहे. प्रशासनाने महामार्गावरील वाहतुक उच्छल-दहिवेल-नंदुरबार मार्गे (Uchhal Dahivel Nandurbar)वळविण्यात आली आहे. दरम्यान, नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर येऊ शकतो म्हणून या संदर्भात प्रशासनाने उपाययोजनाच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
प्रशासनाचे सर्व नागरिकांना आवाहन
नवापूर तालुक्यातील खोकसा धरण भरले आहे. रंगावली धरणातल्यी पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग झाल्यास रंगावली नदीला रात्रीच्या दरम्यान महापूर येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या संदर्भात पालिका व महसूल प्रशासन सज्ज झाले आहे. नदी काठच्या नागरिकांच्या संरक्षणाच्या हेतूने नागरिकांचे स्थलांतर करण्याचे निर्णय प्रशासनाने घेतला आहे. तरी याद्वारे नदीकाठी राहणाऱ्या सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, आपले मौल्यवान सामान, महत्वाचे कागपत्रे, तसेच अन्य महत्वाचे साहित्यांसह इदगाह रोड, सार्वजनिक हॉल/शासकीय विश्रामगृह या ठिकाणी स्थलांतरित व्हावे तसेच आवश्यकतेनुसार नगरपालिका टाऊन हॉल, अग्रवाल भवन आणि हनुमान वाडी या ठिकाणी नागरिकांची सोय करण्यात येईल. अशी माहिती तहसीलदार मंदार कुलकर्णी (Tahsildar Mandar Kulkarni) यांनी दिली.