कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक पावनखिंडीमध्ये दारू पिलेल्या दोन तरुणांना शिवभक्त, ग्रामस्थ आणि पर्यटकांनी चांगलाच चोप दिला आहे. सध्या पन्हाळा – पावनखिंड (Pawankhind) मोहीम सुरू आहे. त्यामुळे पावनखिंड परिसरात शिवभक्तांची मोठी संख्या आहे.
दुपारी दोन तरुण याच ऐतिहासिक पावनखिंड (Pawankhind) परिसरात दारू पिऊन फिरत असल्याचे दिसून आले. त्यावेळी शिवभक्त पर्यटकांनी त्यांना पकडून जाब विचारला. त्यानंतर या तरुणांना नाक घासून ऐतिहासिक भूमीची माफी मागायला सांगितले आणि त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना चांगलाच चोप दिला