Friday, August 1, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर : गोवा बनावटीची 35 लाखांची दारू जप्त

कोल्हापूर : गोवा बनावटीची 35 लाखांची दारू जप्त

औषधे भरली आहेत, असे भासवून गोवा बनावटीची दारू बीडकडे वाहतूक करणारा ट्रक राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने पुणे -बंगळूर मार्गावर गांधीनगर फाटा येथे पडकला.

या ट्रकमधून गोवा बनवटीची विविध ब-डची 35 लाखांची दारू आणि 10 लाखांचा ट्रक असा 45 लाखांचा माल जप्त केला. एक्साईजच्या हातकणंगले विभागाने ही कारवाई केली. याप्रकरणी ट्रकचालक अनिल भाऊसाहेब कदम (वय 33, रा. सावता माळी चौक, जालना रोड, बीड) यास अटक करण्यात आली आहे.

पथकाचे प्रमुख वरिष्ठ निरीक्षक संभाजी बरगे यांनी सांगितले की, पुणे-बंगळूर महामार्गावरून गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक सुरू आहे. ट्रक आणि चारचाकी वाहनातून ही वाहतूक होत असते, असे खात्रीशीररीत्या समजले होते. त्यानुसार गांधीनगर फाट्यावर सापळा रचण्यात आला होता. सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास उचगाव हद्दीतून सहाचाकीच्या कंटेनरमधून गोवा बनावटीची दारू गेवराई (जि. बीड) येथे जाणार असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली होती.
त्यानुसार गांधीनगर फाट्यावर सरकारी गाडीत साध्या वेषात अधिकारी व पोलिस कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले होते. दुपारी चारच्या सुमारास पिवळ्या रंगाचा कंटेनर पुलाची शिरोलीकडे जात असल्याचे निदर्शनास आले. त्याचवेळी या ट्रकचा पाठलाग करून तो ट्रक अडविण्यात आला.

चालकाला माहिती दिल्यानंतर तो ट्रकच्या कंटेनरमध्ये औषधे असून कंपनीने कंटेनर सील केला आहे, असे सांगून त्याने कंपनीचे पत्र पोलिसांना दाखवले. त्यावर आम्ही हे सील तोडणार असून आत काय आहे, हे पाहणार आहोत, असे चालकाला सांगण्यात आले; पण तो तयार होत नव्हता. अखेर त्याला बाजूला घेऊन पोलिसी खाक्या दाखवला, त्यानंतर त्याने आतमध्ये गोवा बनावटीची दारू असल्याचे सांगितले.

या ट्रकमध्ये दारूचे 550 बॉक्स मिळून आले आहेत. या बॉक्समध्ये उच्च दर्जाची दारू होती. ही कारवाई उपअधीक्षक आर.एल.खोत, कागलचे निरीक्षक जगन्नाथ पाटील, दुय्यम निरीक्षक बबन पाटील, शीतल शिंदे, आनंद वाघमारे आदींनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -