Saturday, January 24, 2026
Homeब्रेकिंगसंजय राऊतांवर गुन्हा दाखल, महिलेला शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप

संजय राऊतांवर गुन्हा दाखल, महिलेला शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप

ताजी बातमी ऑनलाईन टीम

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्याविरोधात शनिवारी संध्याकाळी उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फोनवरून महिलेला धमकी दिल्या प्रकरणी वाकोला पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवला गेला आहे. राऊत यांच्यावर कारवाई व्हावी या मागणीसाठी भाजप नेते किरीट सोमय्या वाकोला पोलीस ठाण्यात ठाण मांडून होते. अखेर संध्याकाळी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप व्हायरल (Viral Audio clip)होत आहे. यात फोन दोन व्यक्ती बोलताना ऐकू येत आहेत. यातील एक व्यक्ती महिला आहे तर दुसरी पुरुष आहे. ऑडिओक्लिपमध्ये पुरुष व्यक्ती एक व्यक्ती महिलेला शिवीगाळ करताना ऐकू येते. या ऑडिओक्लिपमधला आवाज हा संजय राऊत यांचाच असल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे. तसेच पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी आणि राऊतांवर कारवाई व्हावी अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली होती. या प्रकरणी त्यांनी आज वाकोला पोलीस ठाण्यात आपली भूमिका मांडली. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -