Saturday, May 18, 2024
Homeइचलकरंजी'गोकुळ'चे दूध 2 रुपयांनी महागणार

‘गोकुळ’चे दूध 2 रुपयांनी महागणार

ताजी बातमी ऑनलाईन टीम

कोल्हापूर : ‘गोकुळ’ने म्हैस दुधाचा विक्री दर 2 रुपयांनी वाढविला आहे. त्याचबरोबर म्हैस दूध उत्पादकांना खरेदी दरही 2 रुपयांनी वाढवून दिला आहे. त्यामुळे म्?हशीचे दूध 2 रुपयांनी महागणार आहे. त्याची अंमलबजावणी सोमवारपासून होणार आहे.

गायीच्या दूध खरेदी दरातही 1 रुपयाने वाढ करण्यात आली असली, तरी विक्री दरात मात्र कोणतीही वाढ करण्यात आली नाही. कोल्हापूरबरोबरच मुंबई व पुणे विभागातही दरवाढ करण्यात आली आहे. ‘गोकुळ’च्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतला. अध्यक्षस्थानी ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील होते.



दि. 1 ऑगस् टपासून म्हैस दूध खरेदी दर 6.0 फॅट व 9.0 एस.एन.एफ. प्रतीच्या दुधास प्रतिलिटर 45 रुपये 50 पैसे असा दर राहील. गाय दूध खरेदी दर 3.5 फॅट व 8.5 एस.एन.एफ. प्रतीच्या दुधास प्रतिलिटर 30 रुपये असा दर राहील. कोल्हापूर, मुंबई, पुणे विभागामध्ये वितरित होणाऱ्या ‘गोकुळ’च्?या फुल्ल क्रीम दूध विक्री दरात 2 रुपये प्रतिलिटर वाढ करण्यात येणार आहे. तसेच गाय दूध, टोण्ड दूध, स्टँडर्ड दूध विक्री दरामध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. विक्री दरात दि. 31 जुलैच्?या मध्यरात्रीपासून वाढ करण्यात येणार आहे. सुधारित दरपत्रक संघामार्फत प्राथमिक दूध संस्थांना पाठवण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -