भारत विरुद्ध वेस्ट इंडिज पाच सामन्यांच्या टी-20 (India vs West Indies T-20 Series) मालिकेतील तिसरा सामना काल (ता. 2 ऑगस्ट) झाला. या सामन्यामध्ये भारताचा 7 गडी राखून दमदार विजय झाला. कालच्या रंजक सामन्यात सुर्यकुमार यादवची खेळी निर्णायक ठरली. आता 5 सामन्यांच्या मालिकेत भारताने 2-1 अशी आघाडी घेतली आहे.
सुरुवातीला भारताचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) टॉस जिंकला आणि त्याने प्रथम गोलंदाजी (Bowling) करण्याचा निर्णय घेतला. मग वेस्ट इंडिजचा संघ फलंदाजीसाठी मैदानावर उतरला असता मेयर्सने 50 चेंडूत 4 षटकार आणि 8 चौकारांच्या मदतीने 73 धावा केल्या. पहिल्या डावामध्ये मेयर्सच्या जोरदार अर्धशतकाच्या बळावर वेस्ट इंडिजने 20 षटकांत 5 बाद 164 धावा केल्या. निकोलस पूरनने 22 धावांची खेळी केली. पॉवेलने 23 धावा तर हेटमायरने 20 धावा केल्या.
भारताला दिलेले टार्गेट पार करताना 19 षटके लागली. तीन गड्यांच्या मोबदल्यात विजय मिळवला. सूर्यकुमार यादवने आक्रमक फलंदाजी करत 44 चेंडूत 4 षटकार आणि 8 चौकारांच्या मदतीने 76 धावा केल्या तर ऋषभ पंतने 26 चेंडूत 33 धावांची तडाखेबाज खेळी केली.
तर कर्णधार रोहित शर्मा 5 चेंडूत 11 धावा करून निवृत्त झाला आणि श्रेयस अय्यरने 27 चेंडूत 24 धावा केल्या.
दीपक हुड्डाही 7 चेंडूत एका चौकाराच्या मदतीने नाबाद 10 धावा करून नाबाद राहिला.
भारतीय संघ – रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकिपर), दीपक हुडा, हार्दीक पांड्या,दिनेश कार्तिक, आवेश खान, रवीचंद्रन आश्विन, भुवनेश्वर कुमार, आणि अर्शदीप सिंह
वेस्ट इंडीज संघ – काइल मेयर्स, ब्रँडन किंग, निकोलस पूरन (कर्णधार), जेसन होल्डर, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, डॉमनिक ड्रेक्स, ओबेद मकॉय, डेवॉन थॉमस, अल्झारी जोसेफ, अकेल हुसेन.