Friday, November 8, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापूरमध्ये मुसळधार पाऊस; रस्त्यावर आले पाणी

कोल्हापूरमध्ये मुसळधार पाऊस; रस्त्यावर आले पाणी

गडहिंग्लज तालुक्यात शनिवारी पहाटेपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. सकाळी ६ वाजल्यापासून सुरु झालेल्या मुसळधारा कायम आहेत. हवामान विभागाने कोल्हापूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी केला आहे. पंधरा दिवस दांडी मारलेल्या पावसाने पुन्हा जोरदारी हजेरी लावल्याने पिकांना मोठा दिलासा आहे.

जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात झालेल्या पावसाने (Orange Alert) हिरण्यकेशी व घटप्रभा नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले होते. त्यानंतर पाऊस कमी झाल्याने नद्यांची पाणीपातळी काहीशी घटली होती. या काळात उन्हाच्या तीव्र झळा सोसाव्या लागल्या.

भात, ऊसासह प्रमुख पीक क्षेत्रातील ओल कमी झाल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली होती. आज सकाळपासून जोरदार सरी कोसळू लागल्या आहेत. मोठ्या सरींनी गडहिंग्लज शहरातील गटारी ओसंडून वाहून रस्त्यांवर पाणीच पाणी झाले आहे. ढगफुटीसदृश पावसाने शिवारेही काही तासांत तुडूंब झाली आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -