ताजी बातमी ऑनलाईन टीम
राधानगरी : गेल्या पंधरा दिवसांपासून ओढ दिलेल्या पावसाने दोन दिवसांपासून पुन्हा दमदार हजेरी लावली आहे. राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्राच्या पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. धरण ८० टक्के भरले आहे. पावसाचा जोर असाच राहीला तर आठवड्याभरात राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे.
काल दिवसभरात १३८ मिमी पाऊस झाला. तर जूनपासून आज अखेर २४१३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. धरणात ६६६८.७२ दशलक्षघनफुट इतका पाणी साठा आहे. संभाव्य पूरपरिस्थिती लक्षात घेवून पाटबंधारे विभागाने वीजनिर्मितीसाठी १६०० क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे.