जिल्ह्यात बुधवारी पावसाचा जोर कमी झाला असला तरी, कोकण क्षेत्रात पावसाची संततधार सुरूच आहे. त्यामुळे राधानगरी धरणाचे दोन स्वंयचलित दरवाजे खुले झाले आहेत. धरणातून ४ हजार ४५६ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगेची पातळी वाढतच असून, त्याची धोका पातळीकडे (४३ फूट) वाटचाल होताना दिसत आहे. पंचगंगेची पातळी वाढल्याने पन्हाळा मार्गावरील केर्लीनजीक रस्त्यावर पाणी आले आहे. रस्त्यावर अर्धाफूट पाणी असून, पाण्यातूनच मार्ग काढत वाहतूक सुरू आहे.
पंचगंगेची धोका पातळी ४३ फूट असुन, कुंभी, कोदे, कासारी धरणातून सुरू असलेल्या विसर्गाने पंचगंगा धोका पातळीकडे (४३ फूट) चालली आहे. बुधवारी सकाळी ११ वाजता पंचगंगेची पातळी ४०.३ फुटांपर्यंत गेली आहे. जिल्ह्यातील ७४ बंधारे पाण्याखाली असून, या पाण्यातूनच मार्ग काढत वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू आहे.
कोल्हापूर, गगनबावडा तालुक्यात गेल्या चोविस तासात 96.9 मिमी पाऊस पडला आहे. यामध्ये हातकणंगले- 12, शिरोळ -3.9, पन्हाळा48.9, शाहूवाडी- 56.2, राधानगरी- 54.2, गगनबावडा- 96.9, करवीर26.4, कागल-13.6, गडहिंग्लज- 13.9, भुदरगड-35.6, आजरा44.5, चंदगड- 51.4 असा पाऊस झाला आहे.
कोल्हापूर : पन्हाळा मार्गावर केर्ली जवळ रस्त्यावर पाणी; अर्धा फूट पाण्यातून वाहतूक सुरू
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -