ताजी बातमी ऑनलाईन टीम
नव्या मंत्रिमंडळाची आज एक महत्वाची बैठक पार पडली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठी घोषणा केली आहे. राज्यात 15 लाख हेक्टर शेतीचं नुकसान झालं आहे. त्यासाठी शेतकऱ्यांच्या (Farmer Help) मागणीनुसार, त्यांना दिलासा देण्यासाठी शिवसेना भाजप सरकारने विशेष बाब म्हर आतापर्यंत कधीही नुकसान भरपाई मिळाली नाही तेवढी, म्हणजे एनडीआरएफच्या नियमाप्रमाणे जी मदत दिली जात होती त्याच्या दुप्पट मदत देण्याचा निर्णय झालाय.
तसच दोन हेक्टरची मर्यादा वाढवून आम्ही ती 3 हेक्टर केली आहे. हा एक मोठा निर्णय आम्ही घेतलाय. एनडीआरएफच्या नियमाप्रमाणे 6 हजार 800 मिळत होती. त्यापेक्षा दुप्पट मदत आम्ही देणार आहोत. म्हणजे प्रतिहेक्टर 13600 रुपये मदतीची घोषणा मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आलीय. त्यामुळे शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळाला आहे.