ताजी बातमी ऑनलाईन टीम
भारत यंदा स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव म्हणजेच 75 वर्ष साजरी करत आहे. स्वातंत्र्य दिनाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘हर घर तिरंगा अभियान’ सुरू केले आहे. प्रत्येकाने घरोघरी तिरंगा फडकवावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. अशामध्ये देशाप्रती प्रेम असलेले प्रत्येक जण आपल्या घरोघरी तिरंगा फडकावत आहेत. तुम्ही सुद्धा या हर घर तिरंगा या मोहिमेअंतर्गत घराघरात राष्ट्रध्वज फडकवणार असाल तर तुम्ही त्याचे सर्टिफिकेट डाउनलोड करू शकता. हे सर्टिफिकेट कसे डाऊनलोड करायचे हे आज आम्ही तुम्हाला काही स्टेप्सद्वारे सांगणार आहोत…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 ऑगस्टच्या दिवशी जनतेशी संवाद साधताना त्यांना खास आवाहन केले होते. पंतप्रधानांनी 2 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीत सोशल मीडियावर राष्ट्रध्वज त्यांच्या प्रोफाइल पिक्चरमध्ये किंवा डीपीमध्ये लावण्याचे आवाहन केले आहे. त्यासोबतच 13 ते 15 ऑगस्टपर्यंत घरोघरी तिरंगा फडकवण्याचेही आवाहन त्यांनी केले आहे. देशभरातील शाळा-शाळांमध्ये या मोहिमेमध्ये विद्यार्थ्यांना सामावून घेण्यासाठी सूचना दिल्या जात आहेत. विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाईटवर रजिस्टर करण्यासही सांगितले जात आहे. अशामध्ये ‘हर घर तिरंगा’ या मोहिमेमध्ये सहभागी होणाऱ्या नागरिकांना सर्टिफिकेट दिले जाणार आहे.
जर तुम्ही तुमच्या घरी तिरंगा फडकावला असेल आणि तुम्हाला या विशेष मोहिमेतील तुमच्या सहभागाचा पुरावा म्हणून प्रमाणपत्र हवे असेल तर विलंब न करता या स्टेप्स फॉलो करुन करून ते डाउनलोड करा.
सर्वात आधी तुम्हाला तुमच्या कम्प्युटर, लॅपटॉप किंवा मोबाईल इंटरनेट ब्राउझरमध्ये harghartirang.com ही वेबसाइट उघडावी लागेल.
– त्यानंतर त्या पेजवर तुमची नोंदणी करा. यासाठी तिथे तुमचे नाव आणि मोबाईल नंबर टाका. तुम्हाला प्रोफाइल पिक्चर देखील द्यावा लागेल.
– आता तुम्हाला गुगल अकाउंटद्वारे लॉग इन करावे लागेल.
यानंतर तुम्हाला लोकेशनचे एक्सेस मागितला जाईल. तुम्ही त्यावर Allow वर क्लिक करा.
– आता तुम्हाला मॅपमध्ये तुमच्या स्थानावर तिरंगा पिन करण्याचा पर्याय मिळेल.
– स्थान पिन केल्यानंतर काही सेकंदांनंतर, तुम्हाला हर घर तिरंगा मोहिमेत सहभागाचे प्रमाणपत्र मिळेल.
– आता त्यावर क्लिक करा आणि डाउनलोड करा.