Monday, February 24, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर :रंकाळा परिसरात मृत माशांमुळे दुर्गंधी

कोल्हापूर :रंकाळा परिसरात मृत माशांमुळे दुर्गंधी

ताजी बातमी ऑनलाईन टीम

कोल्हापूर : रंकाळा तलावात मिसळणाऱ्या सांडपाणी आणि मैलायुक्त पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात मासे मरत आहेत. मृत मासे रंकाळा तलावात तरंगत असून काही प्रमाणात तलावाकाठी पडले आहेत. मृत मासे कुजल्यामुळे परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. रंकाळा तलावात विविध बाजूंनी सांडपाणी मिसळते. वारंवार तक्रार करूनही महापालिका यंत्रणा याबाबत ठोस उपाययोजना करत नाहीत. तसेच रंकाळा प्रदूषण प्रश्नी प्रदूषण नियंत्रण मंडळ कारवाई करीत नाहीत त्यामुळे शहराचे वैभव असणाऱ्या रंकाळ्याचे अस्तित्व धोक्यात येत आहे.


गेल्या काही दिवसांपासून रंकाळा तलावात मृत मासे तरगंत असल्याचे स्थानिक नागरिकांना दिसून आले आहे. स्थानिक नागरिकांनी महापालिकेकडे तक्रार करूनही काही दखल घेतली नसल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे. शनिवारी मृत मासे मोठ्या प्रमाणात तरंगत असल्याचे तसेच रंकाळ्याभोवती परिसरात पडले असल्याचे पर्यावरण कार्यकर्ते दिलीप देसाई यांच्या निदर्शनास आले. त्यांनी संबंधित यंत्रणांना याबाबत सूचना केली आहे. मृत मासे कुजू लागल्याने पाण्यासह परिसरात दुर्गंधी पसरली आहे. सकाळ सायंकाळ फिरण्यास येणाऱ्या नागरिकांसह पर्यटकांनाही या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. महापालिका यंत्रणेने मृत मासे तत्काळ काढून टाकण्याची मागणी दिलीप देसाई यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -