Friday, July 25, 2025
Homeअध्यात्मतरुणींनी शिवलिंगाला करू नये स्‍पर्श, जाणून घ्या काय आहे कारण

तरुणींनी शिवलिंगाला करू नये स्‍पर्श, जाणून घ्या काय आहे कारण

ताजी बातमी ऑनलाईन टीम

पवित्र श्रावण महिना सुरू आहे. श्रावणात सभोवताली निर्मळ वातावरण आणि ओसंडून वाहणारा शिवभक्तांचा उत्साह पाहून मन प्रसन्न होऊन जातं. देवांचे देव महादेवाला प्रिय असलेल्या या महिन्याला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. श्रावण महिन्यातील सोमवारला अनन्य साधारण महत्त्व आहे. श्रावण सोमवारचे व्रत केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे. यासाठी श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी (Shrawan Somvar) व्रत केलं जातं. आवडीचा जोडीदार आणि अखंड सौभाग्यासाठी हे व्रत केले जाते. श्रावण महिन्यात रुद्राभिषेक करणे, शिव-पार्वतीची पूजा केल्यानं सुख-समृद्धी प्राप्त होते. श्रावण महिन्यात शिवप्रभूंची आराधना केल्याने जीवनातील सर्व कष्ट दूर होतात. परंतु पूजा करताना छोटीशी चूक झाली तर ते अशुभ मानले जाते अशी देखील मान्यता आहे. त्यामुळे महादेवाची पूजा करतना कोणत्या गोष्टी करू नये जाणून घेऊया.

तरुणींनी शिवलिंगाला स्‍पर्श करू नये
हिंदू धर्म-पुराणात शिवलिंगाच्या पूजनाच्या अनेक पद्धती सांगितलेल्या आहेत. भगवान भोलेनाथाची मूर्ती आणि शिवलिंगाची पूजा करण्याची आपल्याकडे प्राचीन परंपरा आहे, तर शिवलिंगाचा केवळ रुद्राभिषेक (Rudrabhishek) केला जातो. शिवलिंगाचा अभिषेक करताना काही बाबी आपण लक्षात घ्यायला हव्यात. पूजा करताना तरुणींनी शिवलिंगाला चुकूनही स्‍पर्श करू नये. तरुणींनी शिवलिंगाला (Shivling) स्पर्श करणे वर्जित मानले जाते. तसेच विवाहित महिलांनीनी देखील शिवलिंगला स्पर्श होणार नाही याची काळजी घ्यावी.

तरुणींनी शिवलिंगाला स्‍पर्श का करू नये?
अविवाहित तरुणी आणि महिलांनीशिवलिंगाला स्‍पर्श का करू नये याबाबत धर्म ग्रंथांत सविस्तर माहिती दिलेली आहे. शिवलिंग एक दिव्‍य ऊर्जेचा प्रतीक मानले जाते. विवाहित पुरुष शिवलिंगाची मनापासून पूजा करत असतील तर त्यांच्या जीवनात सुख-समृद्धी नांदते आणि त्यांना संतती प्राप्त होते. अविवाहीत तरुणींनी संततीबाबत विचार करणे मर्यादेच्या पलिकडे आहे. त्यामुळे त्यांनी चुकूनही शिवलिंगाला स्पर्श करू नये असे मानले जाते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -