राज्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाल्याने राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी विरोधी पक्षाकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, राज्यातील पूरग्रस्तांना देण्यात येणारी तात्काळ मदतीच्या रक्कमेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी वाढ करण्यात येत असल्याची घोषणा आज (दि.२३) विधानसभेत केली. पूरग्रस्तांच्या मदतीत ५ हजार रुपयांवरून १५ हजार रुपयांपर्यंत वाढ केली जात (Declaration) घोषणा शिंदे यांनी केली आहे.