ताजी बातमी ऑनलाईन टीम
भारत पाकिस्तानच्या दोन्ही टीम आज जंगी सामना होणार आहे या सांगण्यामध्ये रोहित शर्मा ने कोणत्या दोन खेळाडूंना घेणार हा नक्की कोणता निर्णय घेणार याच्याकडे लक्ष लागलेले आहे. टीम इंडिया आज पाकिस्तान विरुद्ध खेळणार आहे. आशिया कप स्पर्धेतील या महामुकाबल्याकडे सगळ्या क्रिकेट जगताचं लक्ष लागलय.
पाकिस्तान विरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात रोहित शर्मा कोणाला संधी देणार? प्लेइंग 11 कशी असेल? याची सगळ्यांनाच उत्सुक्ता आहे. टीम निवडताना, रोहित शर्मासमोर (Rohit Sharma) ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिक दोघांपैकी प्लेइंग 11 मध्ये ८ कोणाला संधी द्यायची? हा मुख्य प्रश्न असणार आहे. दोघेही विकेटकीपर फलंदाज असून दोघांकडेही एकहाती सामना फिरवण्याची क्षमता आहे. दिनेश कार्तिकला फिनिशरच्या रोलसाठी संघात घेतलं आहे. दिनेश प्रमाणे ऋषभ पंतने सुद्धा आपलं नाण खणखणीत वाजवून दाखवलं आहे. शनिवार संध्याकाळपर्यंत रोहित शर्मा दिनेश कार्तिक आणि ऋषभ पंत या दोघांपैकी कोणाला निवडायच? याबद्दल काही ठरवू शकला नव्हता. ऋषभ पंतच्या रुपाने डावखुऱ्या फलंदाजांचा पर्याय मिळतो, तर दिनेश कार्तिक हाणामारीच्या षटकांमध्ये स्पेशलिस्ट आहे.