Sunday, July 27, 2025
Homeराजकीय घडामोडीRaj Thackeray यांनी घेतली 'त्या' प्रकरणाची दखल, महिलेला मारहाण करणाऱ्या मुजोर मनसे...

Raj Thackeray यांनी घेतली ‘त्या’ प्रकरणाची दखल, महिलेला मारहाण करणाऱ्या मुजोर मनसे पदाधिकाऱ्याला दाखवला घरचा रस्ता

ताजी बातमी ऑनलाईन टीम

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मुजोर पदाधिकाऱ्याचा मुजोरगिरीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मुंबईतील मुंबादेवीत मनसेचा पदाधिकारी एका महिलेला मारहाण करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. आता या प्रकरणाची थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दखल घेतली आहे. राज ठाकरे यांनी मुजोर विनोद अरगिले याची पदावरून हकालपट्टी केली आहे.

मनसेचे पोस्टर लावण्यावरून विनोद अरगिले याने पीडित महिलेशी वाद घातला होता. इतकंच नाही तर अरगिले याने संबंधित महिलेला धक्काबुक्की करत तिच्या कानशिलेत लगावली होती. त्यानंतर या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होती. या प्रकारावरून सर्वच स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. तसेच मनसेच्या मुजोर पदाधिकाऱ्यावर राज ठाकरे काय कारवाई करतात, या कडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. आता राज ठाकरे यांनी अखेर महिलेला मारहाण करणाऱ्या पदाधिकाऱ्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे.

राज ठाकरे यांच्या आदेशानुसार, विनोद अरगिरे याची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. मनसेने याबाबत परिपत्रक देखील काढलं आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले, की मनसे या घटनेचा जाहीर निषेध करत आहे. संबंधित मनसे पदाधिकारी या प्रकरणात दोषी आढळून आला आहे.मनसे अध्यक्षांकडून महिलांचा कायम आदर केला जातो. महिलेला मारहाण करणाऱ्या विनोद अरगिरे याला त्याची जागा दाखवण्यात आली असून त्याची चौकशी सुरू केल्याची माहिती नांदगावकरांनी दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -