Monday, August 4, 2025
Homeमहाराष्ट्रआईस्क्रिमचा हट्ट जीवावर बेतला, 4 वर्षांच्या मुलीचा इलेक्ट्रिक शॉक लागून मृत्यू

आईस्क्रिमचा हट्ट जीवावर बेतला, 4 वर्षांच्या मुलीचा इलेक्ट्रिक शॉक लागून मृत्यू

लहान मुलं हे हट्टी असतात आणि पालक आपल्या पाल्याचे सर्व हट्ट पूर्ण करतात. मात्र नाशिकमध्ये चार वर्षीय मुलीचा (Four Year Old Girl Died In Nashik) आईस्क्रिमचा हट्ट पूर्ण करणं तिच्या जीवावर बेतले आहे. एका मेडिकल स्टोअरमध्ये आईस्क्रीम घेत असताना मुलीला इलेक्ट्रिक शॉक लागून तिचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना (Year Old Girl Died) घडली आहे. ग्रीष्मा विकास कुलकर्णी असे मयत मुलीचे नाव आहे. ही सर्व घटना मेडिकलमध्ये असलेल्या सीसीटीव्हीमध्ये (CCTV) कैद झाली असून अंबड पोलिस ठाण्यात (Ambad Police Stetion) या प्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नाशिकमधील उंटवाडी येथे विशाल कुलकर्णी हे कुटुंबासोबत राहतात. विशाल यांचा नाशिकमध्ये खासगी व्यवसाय आहे. गुरुवारी घरी आल्यानंतर त्यांनी कुटुंबीयांसोबत गणपती बाप्पाची आरती केली. यांनतर मुलगी ग्रीष्माने वडिलांकडे आईस्क्रिम खाण्याचा हट्ट केला. ग्रीष्मा ऐकत नसल्याने अखेर वडील तिला जवळच असलेल्या मेडिकलमध्ये घेऊन गेले. दरम्यान, चिमुकली ग्रीष्माला आईस्क्रीम मिळण्याचा आनंद होता. फ्रीजरमधील विविध फ्लेवरचे आईस्क्रिममधून एक आईस्क्रिम निवडण्यासाठी फ्रीजमध्ये डोकावण्याचा तिने प्रयत्न केला. मात्र फ्रीजची उंची जास्त असल्याने आईस्क्रीमसाठी तिने पाय फ्रिजरच्या ब्रॅकेट वर ठेवले आणि फ्रिजरच्या वायरचा ब्रॅकेटमध्ये उतरलेला इलेक्ट्रिक करंट ग्रीष्माला लागला आणि ती जागेवरच कोसळत बेशुद्ध झाली. ग्रीष्माला तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले.

दरम्यान, विविध शहरांमध्ये आईस्क्रीम फ्रीजर सहसा दुकानाच्या बाहेर ठेवण्यात येतात. त्यांची रात्री सुरक्षा व्हावी यासाठी त्यांना लोखंडी ब्रॅकेट तयार केले जाते. मात्र या फ्रिजरच्या खाली असलेले फ्रिजर जाळीचा करंट बऱ्याच वेळेस ब्रॅकेटमध्ये उतरतो. अनेक वेळेस बूट किंवा चप्पल घातलेली असल्यामुळे हा करंट लागत नाही. मात्र लहान मुले हे अनवाणी असतात आणि त्यांना शॉक लागतो. त्यामुळे अशावेळी अतिक्रमित जागेत बाहेर ठेवलेले फ्रिजर यांची तपासणी वेळोवेळी करणे गरजेचे आहे. तसेच औषधांच्या दुकानाच्या बाहेर अशा फ्रिजरला परवानगी देऊ नये अशी मागणी पालकांतर्फे होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -