ताजी बातमी ऑनलाईन टीम
आशिया चषक 2022 च्या महत्त्वपूर्ण सामन्यात श्रीलंकेच्या संघाने मंगळवारी भारताचा सहा विकेट राखून पराभव केला. त्यामुळे भारतासाठी फायनलचा प्रवास अवघड झाला आहे. भारताला मागच्या दोन सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. अशा स्थितीत जेतेपदाचा सामना खेळण्यासाठी टीम इंडियाला आता अफगाणिस्तान आणि पाकिस्तानसारख्या संघांच्या कामगिरीवर अवलंबून राहावे लागणार आहे. श्रीलंकेकडून कुसल मेंडिसने 57 आणि पाथुम निसांकाने 52 धावांची खेळी केली तर भारताकडून युझवेंद्र चहलने तीन आणि रविचंद्रन अश्विनने एक विकेट घेतली.
पाकिस्तानकडून पराभूत झाल्यानंतर आशिया चषक 2022 च्या तिसऱ्या सामन्यात भारताला श्रीलंककडून पराभव स्विकारावा लागला. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. भारतीय कर्णधार रोहित शर्माने कठीण काळात संघासाठी 42 चेंडूत 72 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. त्यानंतर काही वेळाने सूर्यकुमार यादव 34 धावा करून बाद झाला. याआधी केएल राहुल आणि विराट कोहली स्वस्तात बाद झाले. सुर्यकुमार बाद झाल्यानंतर कोणत्याही खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही. अखेर 20 षटकात भारताने 8 बाद 173 धावांपर्यंत मजल मारली.
भारताचं आशिया चषकाचं स्वप्न भंगलं, श्रीलंकेने 6 विकेटने जिंकला सामना
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -