Monday, July 7, 2025
Homeक्रीडाटी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा! बुमराहचं संघात पुनरागमन, शमी-सॅमसन बाहेर

टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा! बुमराहचं संघात पुनरागमन, शमी-सॅमसन बाहेर

ताजी बातमी ऑनलाईन टीम

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या बहुप्रतिक्षित T20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. अपेक्षेप्रमाणे रोहित शर्माकडे मेगा T20 स्पर्धेसाठी कर्णधारपदाची धूरा सोपवण्यात आली आहे, तर त्याचा सलामीचा साथीदार केएल राहुल संघात उपकर्णधार म्हणून भूमिका पार पाडेल. विराट कोहली, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या या सुपरस्टार फलंदाजांही संघात समावेश करण्यात आला आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या काही काळापासून संघाबाहेर असलेला भारताचा आघाडीचा गोलंदाज जसप्रित बुमराहचं या संघात पुनरागमन होत आहे. मात्र अनुभवी मोहम्म शमी आणि आक्रमक फलंदाज संजू सॅमसन यांना संघात स्थान देण्यात आलेलं नाही.


ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी आयसीसी पुरुष T20 विश्वचषकासाठी आणि घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T20I मालिकेसाठी भारतीय संघ निवडण्यासाठी अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीची सोमवारी बैठक झाली. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल यांनी विश्वचषक आणि ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी संघात पुनरागमन केले आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि दीपक चहर यांचा T20 विश्वचषकासाठी स्टँडबाय खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला आहे आणि तसेच त्यांना घरच्या मैदानावरील दोन मालिकेसाठी संघात देखील स्थान देण्यात आले आहे.


भारताचा संपूर्ण संघ: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर. अश्विन, यूजवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भूवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग. स्टँडबाय खेळाडू – मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -