Monday, July 7, 2025
Homeअध्यात्मआज आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी; जाणून घ्या शुभ मुहूर्त, महत्त्व आणि पूजा...

आज आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी; जाणून घ्या शुभ मुहूर्त, महत्त्व आणि पूजा विधी

ताजी बातमी ऑनलाईन टीम

आज 13 सप्टेंबर रोजी संकष्टी चतुर्थी आहे, तसेच आज मंगळवार देखील आहे आणि मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारकी संकष्टी चतुर्थी देखील म्हटले जाते. धार्मिक श्रद्धेनुसार अंगारकी संकष्टी चतुर्थीला श्रीगणेशची पूजा केल्याने सर्व दु:ख दूर होतात आणि श्री गणेशाची कृपा प्राप्त होते. संकष्टी चतुर्थीला चंद्र दर्शन करणे शुभ मानले जाते. या दिवशी चंद्राला अर्ध्य द्यावे आणि त्यानंतर चतुर्थीचं व्रत पूर्ण करावे.

अंगारकी संकष्टी चतुर्थी व्रताचे महत्त्व
मंगळवारच्या दिवशी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हटले जाते. धार्मिक मान्यतांनुसार या दिवसाला खूप महत्व आहे. या दिवशी भगवान श्री गणेशाची विधिवत पूजा करून उपवास केल्यास जीवनातील सर्व संकट दूर होतात आणि आयुष्यात सुखी-शांती प्राप्त होते. अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्याने आयुष्यातील सर्व विघ्ने बाप्पा दूर करतात अशी मान्यता आहे.

अंगारकी संकष्टी चतुर्थी शुभ मुहूर्त
अंगारकी चतुर्थी तिथी : 13 सप्टेंबर 2022, मंगळवार
अंगारकी चतुर्थी तिथी प्रारंभ : 13 सप्टेंबर रोजी सकाळी 10.37 वाजता
अंगारकी चतुर्थी तिथी समाप्ती : 14 सप्टेंबर रोजी सकाळी 10.23 वाजता
चतुर्थीची पूजा आणि व्रत रात्री चंद्रदर्शनानंतर पूर्ण केले जाते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -