Friday, November 22, 2024
Homeकोल्हापूरराज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर: आता हे असणार कोल्हापूरचे पालकमंत्री

राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर: आता हे असणार कोल्हापूरचे पालकमंत्री

ताजी बातमी ऑनलाईन टीम


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट आणि भाजप यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात सरकार स्थापन झाल्यानंतर जवळपास सव्वा महिन्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त सापडला. ९ ऑगस्टला झालेल्या विस्ताराला दीड महिना उलटल्यानंतर अखेर जिल्हानिहाय पालकमंत्र्यांचं वाटप जाहीर झालं आहे. दीपक केसरकर मुंबई शहर आणि कोल्हापूर, चंद्रकांत पाटील पुणे, शंभुराज देसाईंना ठाणे, संदिपान भुमरेंना औरंगाबादची जबाबदारी देण्यात आली आहे.



विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नागपूरसह सहा जिल्ह्यांची धुरा आहे. फडणवीसांना नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली या अशा विदर्भातील सहा जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद देण्यात आले आहे. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असेल.

इतर पालकमंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे:

चंद्रकांत दादा पाटील – पुणे,
दीपक केसरकर – मुंबई शहर, कोल्हापूर,
अतुल सावे – जालना, बीड,
शंभूराज देसाई – सातारा, ठाणे,
मंगलप्रभात लोढा – मुंबई उपनगर राधाकृष्ण
विखे पाटील – अहमदनगर, सोलापूर,
सुधीर मुनगंटीवार – चंद्रपूर, गोंदिया,
विजयकुमार गावित- नंदुरबार
गिरीश महाजन – धुळे, लातूर, नांदेड,
गुलाबराव पाटील – बुलढाणा, जळगाव दादा भुसे – नाशिक
संजय राठोड – यवतमाळ, वाशिम,
सुरेश खाडे – सांगली,
संदिपान भुमरे – औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)
उदय सामंत – रत्नागिरी, रायगड,
तानाजी सावंत – परभणी, उस्मानाबाद (धाराशिव)
रवींद्र चव्हाण – पालघर, सिंधुदुर्ग,
अब्दुल सत्तार – हिंगोली,

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -