जगभरात फेसबुक, Whatsapp नंतर सर्वाधिक चाहता वर्ग निर्माण झालेल्या फोटो-व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म Instagram वर आता लवकरच युजर्सना खास फीचर्स मिळणार आहेत. यामुळे युजर्सना आता अधिक चांगला अनुभव इंस्टाग्राम वापरताना येणार आहे. कोणते फीचर्स येणार आणि कितपत बदल होणार ते घ्या जाणून..
इंस्टाग्राम युजर्सचा अनुभव सतत जबरदस्त होण्यासाठी नेहमीच नवीन फीचर्स आणत काही अपडेट्स देखील जारी करत असते. आता इन्स्टाग्राम स्टोरी टाईम वाढवण्यासाठी नवीन फीचर्सवर काम करत आहे.
Techcrunch ने केलेल्या दाव्यानुसार, इंस्टाग्रामवर आत्तापर्यंत फक्त 15 सेकंदांपर्यंत स्टोरी आपण पोस्ट करू शकत होतो. पण आता युजर्स लवकरच नवीन फीचरच्या मदतीने पोस्ट करताना स्टोरीमध्ये 60 सेकंदाचे म्हणजेच 1 मिनिटांपर्यंत व्हिडिओ देखील पोस्ट करू शकणार आहेत. दाव्यात म्हटले आहे की, इंस्टाग्राम प्रथम काही वापरकर्त्यांवर या वैशिष्ट्याची चाचणी करेल किंवा सध्या App Store वर जाऊन इंस्टाग्राम अपडेट केल्यानंतर हे फिचर काही भारतीय युजर्सना दिसू शकेल.
रिपोस्ट फिचर: आता नुकतेच इंस्टाग्रामने नवीन रिपोस्ट फीचर्सची घोषणा केली आहे. ट्विटरवर असणाऱ्या री-ट्विटच्या धर्तीवर आणले जाऊ शकते. या फीचर्सशी मिळते जुळते फीचर इंस्टाग्राम लवकरच सादर करणार असल्याचं कळतंय. ज्यामध्ये एका यूजरचे ट्विट इतर इंस्टाग्राम यूजर्सना त्यांच्या प्रोफाईलवर री-ट्विट करण्याची परवानगी असते. यामुळे इंस्टाग्राम मध्ये नवीन फिचरची भर पडेल आणि यूजर वाढण्यातही इंस्टाग्रामला मदत मिळेल. हे फिचर वर्ष संपण्याच्या आतमध्ये येऊ शकते.