संपूर्ण जगाला जगाला अहिंसा, सत्य आणि सहिष्णुतेची शिकवण देणाऱ्या महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांची आज जयंती आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महात्मा गांधींचा मोलाचा वाटा आहे. महात्मा गांधींनी दिलेला अहिंसेचा मार्ग अनेकांनी स्वीकारला आहे. महात्मा गांधींचे विचार आजही अनेकांना जगण्याचा मार्ग शिकवतात. त्यांचे काही विचार जे तुम्हालाही शक्ती देतील आणि जगण्याचा नवा मार्ग देतील. आज महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आपण आपण त्यांचे प्रेरणादायी विचार जाणून घेणार आहोत…
– चारित्र्याचा विकास हेच सर्वात मोठे शिक्षण.
_ ईश्वर म्हणजे सत्य, प्रेम, नीती, ईश्वर भीतीचा अभाव जीवनाचे आणि प्रकाशाचे साधन म्हणजे ईश्वर होय.
– शरीर असेल तोपर्यंत त्याचा उपयोग केवळ सेवेसाठी करावा.
– हा महार, तो ब्राम्हण असा उच्च नीच भाव निर्माण होत असेल तर त्या धर्माला मी धर्म मानणार नाही.
– जोपर्यंत संबंध मानवजातीत ऎक्याच्या भावनेस महत्व दिले जात नाही, तोपर्यंत प्रार्थना, उपवास, जपतप निरर्थक आहेत.
– सुधारणा म्हणजे ज्याच्यामुळे मनुष्य आपले कर्तव्य बजावित राहतो ते आचरण.
– माणसाच्या ठिकाणी जे सत्य, सद्गुण असतात, त्यांना प्रकाशात आणणे हे शिक्षणाचे कार्य आहे.
– जिज्ञासा असल्याशिवाय ज्ञान मिळणे शक्य नाही. जिज्ञासा ही ज्ञानाची पहिली पायरी होय.
– धर्म म्हणजे ईश्वराकडे जाण्याच्या वाटा. माणसातील माणुसकी, मानवता, प्रगट करणारा तो खरा धर्म.
महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त जाणून घ्या त्यांचे 9 विचार, जे तुम्हाला जगणं शिकवेल!
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -