Thursday, July 31, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर; महिलेचा कोयत्याने गळा चिरून खून, संशयितांस पाठलाग करून पकडले

कोल्हापूर; महिलेचा कोयत्याने गळा चिरून खून, संशयितांस पाठलाग करून पकडले

ताजी बातमी ऑनलाईन टीम

कोल्हापूर : कसबा बावडा परिसरातील शहाजीनगर येथे धारदार कोयत्याने गळा कापून महिलेचा निघृण खून केल्याची घटना रविवारी दुपारी घडल्याने खळबळ उडाली. खुनानंतर पळून गेलेल्या संशितास पोलिसांनी पाठलाग करुन ताराराणी चौकात पकडले. घटनास्थळी गनागरीकांनी मोठी गर्दी झाली होती. कविता प्रमोद जाधव (वय ४४, रा. तारळे ता. राधानगरी. जि. कोल्हापूर ) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर अटक केलेल्या संशयितांचे नाव राकेश शामराव संकपाळ (वय 32, रा. शहाजीनगर, कसबा बाद ) असे आहे.



रविवारी दुपारी चार वाजता कसबा बावडा परिसरातील शहाजीनगर येथे संशयित राकेश संकपाळ याने कविता जाधव यांच्यावर धारदार कोयत्यानेप्राणघातक हल्ला केला. केले. महिलेचा गळा चिरून त्यांचा खून केला, खूनानंतर त्याने घटनास्थळावरुन पळ काढला. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पोलीसांनी संशयित राकेश संकपाळ यांचा पाठलाग करून त्याला ताराराणी चौकात पकडले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -